हरारे : टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताच्या (Team India) यंग ब्रिगेडला सिकंदर रझाच्या झिम्बॉब्वेनं (Zimbabwe) पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेच्या पहिल्या मॅचमध्ये पराभूत केलं होतं. भारतीय संघ मालिकेत बरोबरी करणाच्या इराद्यानं आज मैदानात उतरला. कॅप्टन शुभमन गिलनं टॉस जिंकून आज पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) वादळी खेळीच्या जोरावर भारतानं धावसंख्येचा डोंगर उभा केला.  अभिषेक शर्माचं शतक, ऋतुराज गायकवाडचं अर्थशतक आणि रिंकू सिंगच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 20 ओव्हरमध्ये 2 बाद 234 धावा केल्या. झिम्बॉब्वेला विजयासाठी 235 धावांची गरज आहे.


झिम्बॉब्वेला कॅच सोडणं महागात पडलं


भारताला काल झिम्बॉब्वेनं चांगल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर पराभूत केलं होतं. आज मात्र अभिषेक शर्माचा कॅच सोडणं झिम्बॉब्वेला महागात पडलं.  अभिषेक शर्मानं डावाच्या सुरुवातीपासून फटकेबाजीचे इरादे स्पष्ट केले. अभिषेक शर्मानं षटकारानं डावाची सुरुवात केली. आज कॅप्टन शुभमन गिल 2 धावा करुन बाद झाला. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मानं शतकी भागिदारी केली. अभिषेक शर्मानं त्याच्या आंतरराष्ट्रीय टी 20 कारकिर्दितील दुसऱ्याच मॅचमध्ये शतक पूर्ण केलं. अभिषेक शर्मानं 8 षटकार आणि  7 चौकार मारले. दोघांमध्ये 137 धावांची भागिदारी झाली. 


अभिषेक शर्मानं शतक केल्यानंतर लगेचच बाद झाला. यानंतर ऋतुराज गायकवाडनं भारताच्या डावाची धुरा हातात घेतली. ऋतुराजनं रिंकू सिंगच्या मदतीनं  अर्धशतकी भागिदारी केली. ऋतुराज गायकवाडनं देखील कधी संयमी तर कधी आक्रमक फलंदाजी करत एका बाजूनं भारताचा डाव सावरला. ऋतुराज गायकवाडनं देखील अर्थशतक पूर्ण केलं. रिंकू सिंगनं देखील फटकेबाजी केली. ऋतुराज गायकवाडनं 77 तर रिंकू सिंगनं 22 बॉलमध्ये 48 धावा केल्या.
  
 दरम्यान, भारतीय संघात आज साई सुदर्शननं पदार्पण केलं. खलील अहमदला आज संघातून वगळण्यात आलं. भारताच्या फलंदाजांनी त्यांची कामगिरी पार पाडल्यानं टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी गोलंदाजांवर आहे. 
   
टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन - शुभमन गिल (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि मुकेश कुमार


झिम्बॉब्वेची प्लेईंग इलेव्हन - वेस्ली मधेवेरे, इनोसेंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कॅप्टन), डायोन मायर्स, जॉनाथन कैंपबेल, क्लाइव मैडेंडे (विकेटकीपर), वेलिंगटन मसाकादझै, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजरबानी  आणि  तेंदाई चटारा  


संबंधित बातम्या :


Abhishek Sharma : अभिषेक शर्माची वादळी खेळी, दुसऱ्याच मॅचमध्ये शतकाला गवसणी, झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांची धुलाई


IND vs ZIM : झिम्बॉब्वेचा ऐतिहासिक विजय, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा 13 धावांनी पराभव, अपयशाची कारणं कोणती?