IND vs ZIM : झिम्बॉब्वेचा ऐतिहासिक विजय, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा 13 धावांनी पराभव, अपयशाची कारणं कोणती?
सिंकदर रझाच्या नेतृत्त्वातील झिम्बॉब्वेनं भारताच्या यंग ब्रिगेडला 13 धावांनी पराभूत केलं आहे. सिकंदर रझा आणि चटाराच्या गोलंदाजीमुळं भारताला पराभव स्वीकारावा लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर फलदाजांकडून त्यांना योग्य साथ मिळाली नाही.
झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांपुढं भारताची टॉप ऑर्डर आणि मधली फळी कोलमडली.
भारताकडून पदार्पण करणारे ध्रुव जुरेल, रियान पराग, अभिषेक शर्मा यांच्यासारखे नवखे खेळाडू अपयशी ठरले.
झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांनी पहिल्यांदा भारताच्या संघाला टी 20 मॅचेसमध्ये बाद करण्यात यश मिळवलं. यामध्ये सिकंदर रझा, चटारा याच्यासह इतर गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरली.
भारताचे युवा खेळाडू अपयशी ठरले असले तरी ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग यांना देखील मोठी खेळी करण्यात अपयश आलं.