Team India BCCI Jay Shah: गेल्या काही दिवसांआधीच भारतीय संघाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला. याचदरम्यान आता बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी एक मोठं विधान केलं आहे.


जय शाह (Jay Shah) यांनी टी-20 विश्वचषक जिंकण्याचे श्रेय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravidnra Jadeja) यांना दिले आहे. जय शाह यांनी आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल मोठी माहिती दिली. रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असं जय शाह यांनी सांगितले. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल, असा विश्वास देखील जय शाह यांनी व्यक्त केला आहे. टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेआधी देखील जय शाह यांनी भारत यंदा बार्बाडोसमध्ये विश्वचषक जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला होता.






रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता ठरला. याआधी भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक 2007 जिंकला होता. मात्र यानंतर जवळपास 17 वर्षे लोटली तरी यश मिळाले नाही. मात्र, आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 17 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषक जिंकून भारताने 11 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपवला आहे. या T20 विश्वचषकापूर्वी भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली होती. त्यामुळे 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रोहित शर्मा पुन्हा कारनामा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद


पाकिस्तान पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद भूषवणार आहे. 1996 च्या विश्वचषकानंतरची ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) सुरक्षा व्यवस्थेबाबत वेळोवेळी टीका होत आहे, पण अखेर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. पीसीबीने 2 आठवड्यांपूर्वी प्रस्तावित वेळापत्रक ICC ला पाठवले होते, ज्या अंतर्गत 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत सामने होणार आहेत.


संबंधित बातम्या:


Ind vs Zim T20: 'अहंकाराला पायबंद बसला...'; टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शशी थरुर यांचं ट्विट


अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला


Team India Celebration: झाडावर चढलेल्या चाहत्याला पाहून रोहित शर्मा अन् विराट कोहलीने काय केलं?; व्हिडीओची तुफान चर्चा