KL Rahul Ruled Out : वेस्ट इंडीजविरुद्ध टी20 मालिकेलाही केएल राहुल मुकणार, 'या' सामन्यांतून पुनरागमन
WI vs IND T20: वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय टी-20 संघ त्रिनिदाद येथे दाखल झाला असून यावेळी सलामीवर केएल राहुल मात्र संघात नसल्याचं दिसून आलं.
KL Rahul Fitness Update : भारतीय संघातील (Indian Cricket Team) एक अव्वल दर्जाचा फलंदाज आणि सलामीवीर केएल राहुल (Kl Rahul) मागील काही काळापासून दुखापत नंतर कोरोनाची बाधा या सर्वामुळे टीम इंडियाबाहेर आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी20 मालिकेतही तो संघात नसणार आहे. कोरोनातून बरा झाल्यानंतरही अशक्तपणामुळे तो अजूनही बीसीसीआयच्या मेडिक टीमच्या देखरेखीखाली असून भारतीय टी20 संघासोबत वेस्ट इंडीजलाही गेलेला नाही.
वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय टी-20 संघ त्रिनिदाद येथे दाखल झालाय. येत्या 29 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-20 मालिका रंगणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. मात्र, टी-20 हे सर्व खेळाडू मैदानात उतरणार आहेत. पण यामध्ये केएल राहुलचा नाव असूनही तो दुखापतीच्या काऱणामुळे संघासोबत नसून विश्रांतीवर आहे.
कसा आहेय भारताचा टी-20 संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. (केएल राहुल आणि कुलदीप यादव यांची निवड त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.)
झिम्बाब्वे मालिकेत करु शकतो पुनरागमन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल वेस्टइंडीजविरुद्धच्या टी20 मालिकेतील पाचही सामन्यांना मुकणार आहे. पण या मालिकेनंतर भारत झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्यावर जाणार आहे. तोवर राहुल पूर्णपणे ठिक होऊन, या मालिकेत संघात पुनरागमन करु शकतो. 18 ऑगस्टरपासून भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामने सुरु होणार आहेत.
- IOA-RIL Partnership : खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी रिलायन्स सज्ज, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनसोबत करणार भागिदारी
- ODI ranking : विराट कोहलीचं दृष्टचक्र संपेना, 7 वर्षांत सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारी, रोहितची रॅकिंगही घसरली
- BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार