IND vs WI ODI: भारत आणि विडिंजमध्ये वनडे मालिका, हेड टू हेड अन् बरेच काही, एका क्लिकवर
India vs West Indies ODI Record And Stats : कसोटीनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु होणार आहे.
India vs West Indies ODI Record And Stats : कसोटीनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु होणार आहे. आजपासून हे दोन्ही संघ आमनेसामने असतील. बारबाडोसच्या कँसिंग्टन ओवल मैदानावर सामना होणार आहे. याआधी 2022 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये वनडे मालिका झाली होती. पाहूयात दोन्ही संघातील रोचक आकडे
भारत आणि वेस्ट इंडिज वनडे हेड टू हेड
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 23 वी वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये 139 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये 70 सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर वेस्ट इंडिजच्या संघाला 63 सामन्यात विजय मिळाला आहे. त्याशिवाय चार सामने बरोबरीत सुटले तर दोन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. 2019 मध्ये वेस्ट इंडिजने अखेरचा भारताविरोधात विजय मिळवला होता.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील खास आकडेवारी
भारताने वेस्ट इंडिजविरोधात 70 सामन्यात विजय मिळवला आहे. यामध्ये 36 वेळा प्रथम फलंदाजी केली आहे तर 34 वेळा धावांचा पाठलाग करत विजय मिळवला.
वेस्ट इंडिजने 27 वेळा प्रथम फलंदाजी करताना विजय मिळवलाय तर 36 वेळा आव्हानांचा यशस्वी पाठलाग केलाय.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडेची सर्वोच्च धावसंख्या भारताची आहे. 2011 मध्ये इंदोर येथे भारताने आठ बाद 418 धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात विरेंद्र सेहवागने 219 धावांची भागिदारी केली होती.
निचांकी धावसंख्याही भारताच्याच नावावर आहे. 1993 मध्ये भारतीय संघ 100 धावांवर ऑलआऊट झाला होता.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झालेल्या वनडेमध्ये सर्वोच्च भागिदारी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावावर आहे. दोघांनी 246 धावांची भागिदारी केली आहे.
विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. विराट कोहलीने 41 डावात 2261 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीने 9 शतके झळकावली आहेत. वेस्ट इंडिजकडून कर्टनी वॉल्श याने 38 डावात सर्वाधिक 44 विकेट घेतल्या आहेत.
रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोदं आहे. रोहित शर्माने 35 षटकार ठोकले आहेत. तर विराट कोहलीने 239 चौकार लगावले आहेत.
माजी कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक 47 फलंदाजांना बाद केलेय, यामध्ये 14 स्टपिंग आणि 33 झेल आहेत.
भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये 61 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये 32 विजय आणि 28 पराभव स्विकारलेत तर एक सामना बरोबरीत सुटला.
भारताने वेस्ट इंडिजविरोधात वेस्ट इंडिजमद्ये 42 वनडे खेळले आहेत. यामध्ये भारताला 19 विजय आणि 20 पराभवाचा सामना करावा लागला, तीन सामन्याचा निकाल लागला नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये न्यूट्रल ठिकाणी 36 सामने झालेत, त्यामध्ये भारताने 19 विजय आणि 105 पराभव स्विकारलेत 2 सामन्याचा निकाल लागला नाही.