(Source: Poll of Polls)
IND vs WI 1st T20I: ब्रायन लारा स्टेडियमवर आज टीम इंडिया-वेस्ट इंडिज यांच्यात पहिला टी20 सामना; कुठे आणि कधी पाहाल?
IND vs WI: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील पहिला सामना ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांमध्ये आज 26 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे.
IND vs WI Live Streaming: वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ (Team India) आजपासून (03 ऑगस्ट) यजमान संघाविरुद्ध 5 सामन्यांच्या T20 मालिकेला सुरुवात करणार आहे. पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. याआधी खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत टीम इंडियानं 2-1 असा विजय मिळवला होता. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना कधी, कुठे आणि कसा बघता येईल? हे सविस्तर जाणून घेऊयात...
कुठे खेळला जाणार सामना?
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी20 सामना ब्रायन लारा स्टेडियम, तारोबा, त्रिनिदादमध्ये खेळवला जाईल.
कधी आहे सामना?
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना 3 ऑगस्ट, गुरुवारी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, सामना रात्री 8 वाजता सुरू होईल, तर संध्याकाळी 7.30 वाजता नाणेफेक होईल.
टीव्हीवर कुठे पाहाल लाईव्ह?
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात येणारा पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना भारतात टीव्हीवर दूरदर्शनमार्फत लाईव्ह प्रसारित केला जाईल.
लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहाल?
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात येणारा पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याला फॅनकोड (अॅप आणि वेबसाईट) आणि जियोसिनेमा (अॅप आणि वेबसाईट) मार्फत लाईव्ह स्ट्रिम केलं जाईल.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 7 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे.
टीम इंडियाचा टी20 संघ
यशस्वी जायसवाल, ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान, रवि बिश्नोई, तिलक वर्मा.
वेस्ट इंडीजचा टी20 संघ
काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शिमरोन हेटमायर, रोवमॅन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅकॉय, ओशाने थॉमस, ब्रँडन किंग, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IND vs WI : टी20 चा बादशाह वनडेमध्ये फ्लॉप, पाहा सूर्याचे आकडे काय सांगतात