यशस्वी जयस्वालच्या एन्ट्रीनंतर शुभमन गिलचा मोठा निर्णय, द्रविडसोबतच्या चर्चेनंतर म्हणाला...
Why Shubman Gill At Number 3 : आजपासून भारत आणि कॅरेबिअन आर्मीमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
Why Shubman Gill At Number 3 : आजपासून भारत आणि कॅरेबिअन आर्मीमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताला वर्ल्ड टॅस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या अपयशाला मागे टाकत रोहितसेना महिनाभरानंतर मैदानात उतरणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूसह मैदानात उतरणार, हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. पण सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली... स्टार फलंदाज शुभमन गिल सलामीला नव्हे तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे, असे रोहितने सांगितले.
वेस्ट इंडिजविरोधात यशस्वी जायस्वाल पदार्पण करणार असून तो रोहित शर्मासोबत सलामीला उतरणार आहे. रोहित शर्माने तसे संकेतही दिले. यशस्वी जायस्वाल सलामीला खेळणार असल्यामुळे शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय शुभमन गिल याने स्वत: घेतला आहे. याबाबत यशस्वी जायस्वाल याने कोच राहुल द्रविड यांच्याशीही बातचीत केली, असे रोहित शर्माने सांगितलेय.
रोहित शर्मा म्हणाला की, शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. कारण, त्याला स्वत:ला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. याबाबत त्याने कोच राहुल द्रविड याच्याशीही बातचीत केली. गिलने राहुल द्रविडला सांगितले की, मी आतापर्यंत सर्व क्रिकेट तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळलो आहे. त्यामुळे मला संधी मिळाली तर मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरु शकतो.
IND vs WI संभावित प्लेइंग XI:
भारतीय संघ - : रोहित शर्मा (कर्णधार),यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन/केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडीज : क्रैग ब्रॅथवेट (कर्णधार), चंद्रपॉल, रेमन रीफर, रहकीम कॉर्नवाल, जर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाजे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, शैनन गेब्रियल
तिसऱ्या हंगामाची आजपासून सुरुवात -
वर्ल्ड चेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात रोहित शर्मा अॅण्ड कंपनी आजपासून करणार आहे. पहिल्या दोन हंगामात फायनलमध्ये पोहचूनही भारतीय संघाला जेतेपदाला गवसणी घालता आली नव्हाती. आधी न्यूझीलंडने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताच्या स्वप्नावर पाणी फेरले. आता नव्या उमेदीने भारतीय संघ पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे. यावेळी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी चेतेश्वर पुजाराला डावलून युवा खेळाडूवर विश्वास दाखवला आहे. पुजाराच्या जागी आता गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. वेस्ट इंडिजविरोधात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय, हे पाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आणखी वाचा :
यशस्वीच्या खडतर प्रयत्नाला यश, भारतीय संघात पदार्पणाची संधी, जाणून घ्या कामगिरीविषयी
ठरलं! यशस्वी जायस्वाल करणार कसोटीत पदार्पण, गिल तिसऱ्या क्रमांकावर, रोहित शर्मानं दिले संकेत