IND vs WI T20, Highlights : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील चौथ्या टी20 सामन्यात भारताने दमदार असा 59 धावांनी वेस्ट इंडीजवर विजय मिळवला आहे.या विजयामुळे भारताने मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. टी20 मालिका पाच सामन्यांची असल्याने 3 सामने जिंकत भारत जिंकला आहे. आता अखेरचा सामना रविवारी 7 ऑगस्ट रोजी होईल
सामन्यात सर्वप्रथम वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती भारताने आखली होती. पण भारताच्या खेळाडूंनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने 191 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यावेळी अनेकांनी योगदान दिलं पण ऋषभ पंतनं केलेली 44 धावांची दमदार खेळी महत्त्वाची ठरली. कर्णधार रोहितने 33 तर संजू सॅमसननं नाबाद 30 धावा केल्या.
191 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस़्ट इंडीजचे फलंदाज सुरुवातीपासून धावांसाठी लढत होते. त्यांना खास खेळ दाखवता येत नव्हता. यावेळी कर्णधार निकोलस पूरन आणि रोव्हमेन पोव्हेल यांनी सर्वाधिसक 24 रन प्रत्येकी केले. इतर खेळाडूंना खास कामगिरी न करता आल्याने विंडीज 19.1 षटकात 132 वर सर्वबाद झाले. ज्यामुळे भारत 59 धावांनी जिंकला आहे. भारताकडून सर्वाधिक अर्शदीप सिंहने 3 तर रवी बिश्नोई, आवेश आणि अक्षर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.यावेळी अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या आवेश खानला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
हे देखील वाचा-
- IND W vs ENG W: भारतीय महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये दाखल, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड पराभूत, विजयासह पदकही निश्चित
- Asia Cup 2022 Schdeule: ठरलं! आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात, तर 11 सप्टेंबर रोजी फायनल, वाचा सविस्तर वेळापत्रक एका क्लिकवर
- Naveen Wins GOLD : भारताची सुवर्णपदकांची हॅट्रीक, दिवसातील तिसरं गोल्ड कुस्तीपटू नवीनने मिळवून दिलं, पाकिस्तानच्या मुहम्मदला दिली मात