Asia Cup : क्रिकेटमधील अव्वल दर्जाचे देश असणाऱ्या आशिया खंडासाठीची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप 2022 (Asia Cup 2022) लवकरच पार पडणार अशी माहिती समोर येत होती.पण आता नुकतंच या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली असून बीसीसीआयने देखील जय याचं ट्वीट पोस्ट केलं आहे.  27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार असून 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे. 

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...

सामनादिवसदिनांकसंघग्रुप ठिकाण 
1शनिवार27 ऑगस्टअफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकाबीदुबई
2रविवार28 ऑगस्टभारत विरुद्ध पाकिस्तानदुबई
3मंगळवार30 ऑगस्टबांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान बीशारजाह
4बुधवार31 ऑगस्टभारत विरुद्ध पात्र संघदुबई
5गुरुवार1 सप्टेंबरश्रीलंका विरुद्ध बांग्लादेश बीदुबई
6शुक्रवार2 सप्टेंबरपाकिस्तान विरुद्ध पात्र संघशारजाह
7शनिवार3 सप्टेंबरग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4शारजाह
8रविवार4 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2सुपर 4दुबई
9मंगळवार6 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1सुपर 4दुबई
10बुधवार7 सप्टेंबरग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4दुबई
11गुरुवार8 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4दुबई
12शुक्रवार9 सप्टेंबरग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2सुपर 4दुबई
13रविवार11 सप्टेंबरसुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2सुपर 4दुबई

 

हे देखील वाचा-