Wrestling in Commonwealth 2022 : भारताच्या कुस्तीपटूंनी आणखी एक पदक खिशात घातलं आहे. विशेष म्हणजे दिवसातलं सलग तिसरं सुवर्णपदक भारताने जिंकलं आहे.भारताचा कुस्तीपटू नवीन (Naveen) याने 74 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहीरला नमवत सुवर्णपदक जिंकलं आहे. त्याने मुहम्मदला 9-0 च्या फरकाने मात देत गोल्ड मेडल मिळवलं आहे. त्याच्या काही वेळ आधीच महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) हिने तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) सुवर्णपदक जिंकलं असून रवी दहियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.











भारताचं कुस्तीतील दहावं पदक 


भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर मोहित ग्रेवालने कांस्यपदक मिळवल्यानंतर पुजानेही कांस्यपदकाला गवसणी घातली ज्यानंतर काही वेळातच रवी दहिया, विनेश फोगाटसह आता नवीननं सुवर्णपदक जिंकलं आहे. 








हे देखील वाचा-