India vs West Indies  : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज दुसरा टी20 सामना वॉर्नर पार्क मैदानात सुरु आहे. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत केवळ 138 रन केले असून आता वेस्ट इंडीजला जिंकण्यासाठी 120 चेंडूत 139 रन करायचे आहेत. वेस्ट इंडीजच्या ओबेद मकॉय याने अप्रतिम गोलंदाजी करत 6 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे भारताचा संघ इतक्या स्वस्तात माघारी परतला आहे.



सामन्यात सर्वप्रथम वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला जो संघातील गोलंदाजांनी योग्य असल्याचं अगदी पहिल्या चेंडूपासून दाखवलं, यावेळी सर्वात पहिल्या चेंडूवर भारताचा कर्णदार रोहितला तंबूत धाडण्यात आलं. नंतर भारताचे बहुतेक फलंदाज पटापट तंबूत परतत होते. हार्दीक पांड्याने सर्वाधिक 31 रन केले. तर जाडेजा आणि पांड्या यांनी अनुक्रमे 27 आणि 24 रन केले. ज्यामुळे भारत 19.4 षटकात 138 रनच करु शकला. वेस्ट इंडीजच्या सर्वच गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. पण आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ओबेद मकॉय याने यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत तब्बल सहा विकेट्स घेतले. त्याच्याशिवाय जेसन होल्डरने दोन आणि अल्झारी जोसेफ आणि अकेल हुसेनने एक-एक विकेट घेतली.


एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने भारताने जिंकले आणि वेस्ट इंडीजला 39 वर्षांत प्रथमच त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला. ज्यानंतर आता भारत टी20 मालिकाही जिंकून एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे, आजचा सामना जिंकून मालिकेतील आघाडी वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असून वेस्ट इंडीज बरोबरी करण्यासाठी मैदाणात उतरला आहे. पण विंडीजचा खेळ पाहता सामना त्यांच्याच बाजूने झुकताना दिस आहे.