ICC Womens 2025 World Cup : महिला क्रिकेटच्या आगामी विश्वचषक सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केल्यानंतर यावेळी 2025 सालचा महिला विश्वचषक (ICC Womens World Cup 2025) भारतात होणार असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर बीसीसीआयने आयसीसीचे आभार मान ही स्पर्धा अगदी दणक्यात पार पडणार असल्याचा निर्धार केला आहे. सचिव जय शहा तसंच अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही याबाबत माहिती दिली असून बीसीसीआयने ट्वीट केलं आहे.
काय म्हणाले जय शहा?
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, 'आयसीसीने 2025 विश्वचषकाचं यजमानपद भारताला दिलं असल्याने आम्ही फार आनंदी आहोत. आम्ही कोणतीच कसर यावेळी सोडणार नाही. एक अविस्मरणीय स्पर्धा यावेळी घडवून दाखवू. महिला क्रिकेटसाठी बीसीसीआय कायम अग्रेसर राहिलं असून सर्व सोयीसुविधांच्या जोरावर एक य़शस्वी स्पर्धा आम्ही पार पाडू.'
महिला क्रिकेटला मागील काही वर्षात अगदी अच्छे दिन आल्याचं दिसून आलं आहे. भव्य स्पर्धाच नाही तर दौरे आणि महिला आय़पीएलही पार पडत आहे. अशामध्ये महिला क्रिकेटच्या आगामी भव्य स्पर्धांबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) माहिती दिली आहे. बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी 2024 पासून ते 2027 पर्यंतच्या महिला आयसीसी स्पर्धांबद्दल माहिती देण्यात आली आहे. यावेळी भारतामध्येही स्पर्धेचं आयोजन होणार असून 2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचं आयोजन भारतात होणार आहे.
कसं आहे महिलांचं 2024 ते 2027 मधील वेळापत्रक?
वेळापत्रकाचा विचार करता 2024 मध्ये बांग्लादेशमध्ये आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) पार पडणार आहे. यावेळी 10 संघ स्पर्धेत सहभागी होणार असून एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच पुढील वर्षी 2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषक (Womens World Cup 2025) भारतात खेळवला जाणार आहे. यावेळी 8 एकमेंकाविरुद्ध आमने-सामने असणार आहेत. तर एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच 2026 मध्ये आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 (Womens T20 World Cup 2026) इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. यावेळी 12 संघामध्ये 33 सामने खेळवले जाणार आहेत. 2027 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा (2027 Champions Trophy) खेळवली जाणार असून 6 संघामध्ये 16 सामने श्रीलंकेच्या भूमीत पार पडणार आहेत.
हे देखील वाचा-
- Womens T20 WC Host : 2024 ते 27 दरम्यानच्या आयसीसीच्या महिला क्रिकेट स्पर्धाचं वेळापत्रक ठरलं, भारताकडेही यजमानपद, वाचा सविस्तर
- IND vs WI : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज, एक विजय आणि 39 वर्षांत पहिल्यांदाच करणार 'ही' कामगिरी
- IND vs WI, 2nd ODI Result : अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी