एक्स्प्लोर

IND Vs WI, 1st T20 Live : विडिंजपुढे युवा टीम इंडियाचे आव्हान, पहिल्या टी20 सामन्याचे लाईव्ह अपडेट

IND Vs WI 1st T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

LIVE

Key Events
IND Vs WI, 1st T20 Live : विडिंजपुढे युवा टीम इंडियाचे आव्हान, पहिल्या टी20 सामन्याचे लाईव्ह अपडेट

Background

IND Vs WI 1st T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने कसोटी आणि वनडे मालिका खिशात घातली आहे. आता टी20 मध्ये यजमान वेस्ट इंडिज युवा भारतीय संघाचा कसा सामना करणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. पुढील वर्षी जूनमध्ये टी 20 विश्वचषक होणार आहे. त्याआधी भारतीय संघाची बांधणी सुरु झाली आहे. अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आलाय. यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा यासारख्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ अनुभवी दिसत आहे. टी 20 चे अनेक धुरंधर वेस्ट इंडिज संघात दिसत आहेत. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ भिडणार आहेत. 

टी २० मालिकेत भारतीय संघात सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यासारखे सिनिअर खेळाडूंना आराम दिलाय. हार्दिक पांड्या नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघात काही अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टी २० साठी वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखले जातात. त्यामुळे ही मालिका रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 7 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

पिच रिपोर्ट

ब्रायन लारा स्टेडियममध्ये आतापर्यंत फक्त एकच टी20 आंतरराष्ट्रीय सामना झालाय. 2022 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये हा सामना झाला होता. हा सामना टीम इंडियाने जिंकला होता. एकमेव टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली होती. याआधीही वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे वरचस्व असेल, असे दिसतेय. सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. त्यानंतर सामना जसाजसा पुढे जाईल तसातसा फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल.

सामन्यांची वेळ काय ?

तीन ऑगस्टपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल..

कुठे पाहाल सामने -

हा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. याव्यतिरिक्त सामना मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर मोफत पाहता येऊ शकतो. फॅनकोडवरही सामना पाहता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थाळवरही सामन्याबाबत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.

पाच सामन्याच्या टी २० मालिकेसाठी दोन्ही संघात कोण कोणते शिलेदार.... india vs west indies t20 squad

वेस्ट इंडिजचा संघात कोण कोण ?

रोवमन पॉवेल (कर्णधार), काईल मेयर्स (उप कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅक्कॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशेने थॉमस.

टी20साठी भारतीय संघ -

इशान किशन (विकेटकिपर) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

पाच सामन्याच्या टी२० मालिकेचं वेळापत्रक काय ? india vs west indies t20 schedule : - 

टी 20 सामने (संध्याकाळी 8 वाजता)

3 ऑगस्ट 2023 - पहिला टी20 सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

6 ऑगस्ट 2023 - दुसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना

8 ऑगस्ट 2023 - तिसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना

12 ऑगस्ट 2023 - चौथा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा 

13 ऑगस्ट 2023 - पाचवा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा

23:53 PM (IST)  •  03 Aug 2023

वेस्ट इंडिजचा पाच धावांनी विजय

IND Vs WI, 1st T20 : पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने पाच धावांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 विकेटच्या मोबल्यात 145 धावाच करता आल्या. भारताकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या टी 20 मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 ने आघाडी घेतली.

23:43 PM (IST)  •  03 Aug 2023

भारताला आठवा धक्का

कुलदीप यादव याला बाद करत भारताला आठवा धक्का दिला. भारताला विजयासाठी पाच चेंडूत दहा धावांची गरज

23:36 PM (IST)  •  03 Aug 2023

भारताला सातवा धक्का

अक्षर पटेलच्या रुपाने भारताला सातवा धक्का बसलाय. अक्षर पटेल 13 धावा काढून बाद झाला. 

23:35 PM (IST)  •  03 Aug 2023

जेसन होल्डरचा भेदक मारा

150 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना अनुभवी जेसन होल्डरने भेदक मारा केला. होल्डरने 4 षटकात 19 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट घेतल्या. यामध्ये एक षटक निर्धाव फेकले. 

23:21 PM (IST)  •  03 Aug 2023

भारताला सहावा धक्का

संजू सॅमसनच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसलाय. संजू सॅमसन 12 धावांवर धावबाद झाला. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget