एक्स्प्लोर

IND vs WI: अरेच्चा! सूर्यकुमार यादवमुळे बाद झाला ऋषभ पंत, पाहा VIDEO

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने सहा विकेट्सनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

IND vs WI, 1st ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला सहा विकेट्सनी मात दिली. या विजयासह भारताने मालिकेतही 1-0 ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंत अजबरित्या धावचीत झाला. यावेळी सूर्यकुमारचा एक शॉट यामागील कारण ठरला. आता नेमकं काय झालं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

सामन्यात भारताला 177 धावांची गरज होती. रोहितने अर्धशतक पूर्ण करत चांगली सुरुवात केली. पण नंतर विराट, किशन स्वस्तात माघारी परतले. अशावेळी पंत आणि यादव यांनी खेळ सांभाळला. दरम्यान 18 व्या षटकांत ए. जोसेफ गोलंदाजी करत होता. त्यावेळी सूर्यकुमारने एक स्ट्रेट ड्राईव्ह मारला पण तो चेंडू थेट नॉन स्ट्राईकरजवळील स्टम्प्सना लागला. त्यापूर्वी जोसेफ याच्या पायालाही चेंडू लागला होता. दरम्यान त्याचवेळी धाव घेण्यासाठी पंतही काहीसा पुढे आला. ज्यामुळे तो अनपेक्षितरित्या धावचीत झाला. दरम्यान अशाप्रकारे पंत बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन यानेही त्याचे सांत्वन केले. 

भारताचा सहा विकेट्सने विजय

सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना हात खोलण्याची संधी दिलीच नाही. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा जेसन होल्डर (57) याने केल्या असून कर्णधार पोलार्डतर शून्यावर बाद झाला. ज्यामुळे संघ 43.5 ओव्हरमध्ये 176 धावांच करु शकला आहे. भारताकडून युझवेंद्र चहलने 4, सुंदरने 3, प्रसिधने 2 आणि सिराजने 1 विकेट घेतली. ज्यानंतर 177 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून रोहित आणि इशान यांनी उत्तम सुरुवात केली. पण अर्धशतक होताच 60 धावांवर रोहित बाद झाला. त्यानंतर इशान (28), कोहली (8), पंत (11) हे पटापट तंबूत परतले. पण नंतर सूर्यकुमार यादव (नाबाद 34) आणि दीपक हुडा (नाबाद 26) यांनी अखेरपर्यंत क्रिजवर टीकत राहून भारताचा विजय पक्का केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...Prithviraj Chavan : शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बांगलादेशी घुसखोरी,पृथ्वीराज चव्हाणांचं विश्लेषणABP Majha Headlines 4 PM Top Headlines  4 PM 1 April 2025 संध्या 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
Embed widget