(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs WI, 1st ODI, Toss Update : वेस्ट इंडीजने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली आहे. विंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
India vs West Indies Toss Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर सुरु होणाऱ्या या सामन्यात जिंकणारा संघ मालिकेत 1-0 ची आघाडी घेणार असल्याने दोघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा दिग्गज खेळाडू रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे सामन्याला मुकणार आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे.
West Indies have won the toss and they will bowl first in the 1st ODI against #TeamIndia
— BCCI (@BCCI) July 22, 2022
Live - https://t.co/tE4PtTfY9d #WIvIND pic.twitter.com/g0iXOX9Uki
हा सामना पार पडणाऱ्या मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अधिक फायदेशीर असून त्यांना जास्त विकेट मिळून ते धावाही रोखू शकतात. दरम्यान यामुळे भारतीय गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहलकडे अधिक असेल. मैदानाची खेळपट्टी एक मोठी धावसंख्या देखील संघाना मिळवून देऊ शकते. त्यामुळे किमान 250 धावसंख्या अपेक्षित आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीजचा संघ आतापर्यंत 136 वेळा आमने- सामने आले आहेत. यापैकी 67 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 63 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं बाजी मारलीय. यातील चार सामने रद्द झाले आहेत. महत्वाच म्हणजे, वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या अखेरच्या पाच एकदिवसीय सामने भारतानं जिंकले आहेत.
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
हे देखील वाचा-
- World Athletics Championships 2022: रोहित यादवचं नीरज चोप्राच्या पावलावर पाऊल, 80.42 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली!
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!