IND vs SL 1st T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. आजच्या सामन्यात श्रीलंका प्रथम गोलंदाजी करुन भारताला कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीलंका संघाने मागील काही सामन्यात उत्तम गोलंदाजी केली असल्याने त्यांनी आजही प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.   


नुकताच भारताने वेस्ट इंडिजला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 सामन्यात व्हाईट वॉश दिला. ज्यानंतर आता भारतीय भूमीतच भारत श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडणारा हा पहिला टी20 सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. एकूण तीन सामन्यांची ही मालिका असून भारत तिन्ही सामने जिंकून वेस्ट इंडीजप्रमाणे श्रीलंकेलाही क्लीन स्वीप देण्यासाठी भारत संपूर्ण प्रयत्न करणार हे नक्की. भारताकडून आज दीपक हुडा याने टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.



पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (India’s T20I squad) 


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल


पहिल्या टी-20 सामन्यासाठी श्रीलंका संघ (Sri Lanka T20I squad) 


दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसानका, कुसल मेन्डिस, चरित असलांका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, कामिल मिशारा, जेफरी वॅनडर्से, जनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha