IPL Mega Auction 2022: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये इंग्लंडचे एकूण 11 खेळाडूंवर फ्रँचायझीनं बोली लावली. तर, इंग्लंडच्या 8 खेळाडूंसाठी कोणत्याही फ्रँचायझीनं उत्सुकता दाखवली नाही. अनसोल्ड ठरलेल्या खेळाडूंच्या यादीत काही आश्चर्यकारक करणारी नावे देखील आहेत. इऑन मॉर्गन, जॉर्ज गार्टेन,  डेव्हिड मलान आणि आदिल रशीद यांना कोणत्याही फ्रँचायझीनं विकत घेतलं नाही. तर, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन हा लिलावात इंग्लंडचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. त्याला पंजाब किंग्सनं 11.50 कोटी रुपयांना विकत घेतलंय. तर, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये बोली लागणारे 11 खेळाडू कोण आहेत? कोणत्या फ्रँचायझीनं त्यांना किती रुपयात विकत घेतलंय? याबद्दल जाणून घेऊयात. 

इंग्लंडचं स्फोटक फलंदाज जेसन रॉय आणि अॅलेक्स हेल्स अतिशय स्वस्तात विकले गेले. रॉयला गुजरात टायटन्सनं अवघ्या दोन कोटींमध्ये त्यांना विकत घेतलं. त्याचवेळी हेल्सला केकेआरने 1.50 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केलंय. याशिवाय, सॅम बिलिंग्स आणि डेव्हिड विली यांनाही मोठी रक्कम मिळाली नाही.

ऑक्शनमध्ये विकत घेतलेले इंग्लंडचे 11 खेळाडू-

खेळाडूंची नावं संघ किंमत
जेसन रॉय  गुजरात टायटन्स  2 कोटी
जॉनी बेअरस्टो पंजाब किंग्ज 6.75 कोटी
मार्क वूड   लखनौ सुपर जायंट्स 7.50 कोटी
टायमेल मिल्स  मुंबई इंडियन्स 1.50 कोटी
जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्स 8 कोटी
सॅम बिलिंग्स  कोलकाता नाईट रायडर्स 2 कोटी
ख्रिस जॉर्डन  चेन्नई सुपर किंग्ज  3.60 कोटी
अॅलेक्स हेल्स  कोलकाता नाईट रायडर्स 1.50 कोटी
लियाम लिव्हिंगस्टोन पंजाब किंग्ज 11.50 कोटी
डेव्हिड विली आरसीबी 2 कोटी
बेनी हॉवेल पंजाब किंग्स 40 लाख

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha