IND vs SL: युजवेंद्र चहलकडं टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज बनण्याची संधी
IND vs SL T20 Series: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आज (03 जानेवारी 2023) श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
IND vs SL T20 Series: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आज (03 जानेवारी 2023) श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेद्वारे भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात करेल. या मालिकेत दमदार प्रदर्शन करून प्रत्येक खेळाडू टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होण्याचा प्रयत्न करेल. यातच भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टी-20 क्रिकेटमधील खास विक्रम आपल्या नावावर नोंदवण्यासाठी सज्ज झालाय. या मालिकेत युजवेंद्र चहलकडं भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar kumar) खास विक्रम मोडण्याची आणि टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याची संधी आहे. या विक्रमापासून तो फक्त चार विकेट्स दूर आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 90 विकेट्सची नोंद आहे. त्यानंतर 87 विकेट्ससह युजवेंद्र चहल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच आर अश्विन 72 विकेट्ससह तिसऱ्या, जसप्रीत बुमराह 70 चौथ्या आणि हार्दीक पांड्या 62 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
क्रमांक | गोलंदाज | विकेट्स |
1 | भुवनेश्वर कुमार | 90 |
2 | युजवेंद्र चहल | 87 |
3 | आर अश्विन | 72 |
4 | जसप्रीत बुमराह | 70 |
5 | हार्दिक पांड्या | 62 |
श्रीलंकेचा टी-20 संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.
भारताचा टी-20 संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.
हे देखील वाचा-