टीम इंडिया येण्याआधीच श्रीलंकेला मोठा धक्का, कर्णधाराने अचानक दिला राजीनामा
Wanindu Hasaranga Leave Captaincy : 26 जुलैपासून श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये टी20 आणि वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय.
Wanindu Hasaranga Resigns Captaincy : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 26 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान (India vs Sri Lanka T20 2024 Full Schedule )तीन सामन्याची टी20 आणि वनडे सामन्याची मालिका होणार आहे. पण त्याआधीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू वानिंदु हसरंगा यानं अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हसरंगाने आज आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे दिलाय. टीम इंडिया येण्याआधीच कर्णधाराने राजीनामा दिल्यामुळे श्रीलंका बोर्डापुढे कर्णधार कुणाला करायचं, असा पेच निर्माण झालाय.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्रेस रिलिज जारी करत हसरंगाच्या राजीनाम्याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलेय की, श्रीलंका क्रिकेट जनतेला कळवू इच्छिते की राष्ट्रीय पुरुष T20 कर्णधार वानिंदू हसरंगा याने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. वानिंदू हसरंगाने जरी T20 संघाचे कर्णधारपद सोडले असले तरी तो एक खेळाडू म्हणून संघातच राहणार आहे.
वानिंदु हसरंगाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "एक खेळाडू म्हणून मी श्रीलंकेसाठी नेहमीच सर्वोत्तम प्रयत्न करेन. नेहमीप्रमाणेच मी माझ्या संघाला आणि नेतृत्वाला पाठिंबा देईन." हसरंगाचा राजीनामा स्वीकारताना, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, आमच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट योजनांमध्ये वानिंदू हसरंगा आमच्यासाठी एक महत्त्वाचा खेळाडू राहील.
Ahead of Sri Lanka's white-ball series against India later this month, leg-spin all-rounder Wanindu Hasaranga has resigned as the side’s T20I captain. Hasaranga was appointed as Sri Lanka’s T20I captain last year and led the team in 10 matches. pic.twitter.com/bPcivFvwOi
— IANS (@ians_india) July 11, 2024
26 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया श्रीलंकाविरोधात वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. टी20 चे सर्व सामना पल्लेकेल येथे होणार आहेत, तर वनडे सामने कोलंबो येथील मैदानात होणार आहेत. या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक आज जारी करण्यात आले आहे.
टी20 मालिकेचं वेळापत्रक काय, कधी सामने?-
पहिला टी20 सामना - शुक्रवार, 26 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
दुसरा टी20 सामना - शनिवार, 27 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
तिसरा टी20 सामना - सोमवार, 29 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
वनडे सामन्याच्या मालिकेचं वेळापत्रक काय ?
पहिला वनडे सामना - गुरुवार, 1 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो
दुसरा वनडे सामना - रविवार, 4 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो
पहिला वनडे सामना - गुरुवार, 7 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो