एक्स्प्लोर

"आयपीएल वाला रुल है क्या!" 'तो' व्हिडीओ समोर आल्याने केएल राहुल ट्रोल, पण त्याने असा प्रश्न नेमका का केला?

सध्या श्रीलंकेत भारत आणि श्रीलंकाय यांच्यात एकदिवसीय सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांत के एल राहुलने रोहित शर्माला विचारलेल्या एका प्रश्नाची सगळीकडे चर्चा होत आहे.

कोलंबो : सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. तेथे भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदीवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांनी विजयी कामगिरी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. मात्र हा सामना शेवटी ड्रॉ झाला. दरम्यान, याच सामन्यातील भारताचा यष्टीरक्षक के एल राहुल याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सामना चालू असताना राहुलने आयपीएलचा उल्लेख करत एका नियमाबाबत विचारले आहे. राहुलच्या या संभाषणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 

नेमकं काय घडलं? 

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 14 व्या षटक टाकण्यासाठी शिवम दुबे याच्याकडे चेंडू सोपवण्यात आला होता. भारताला एका विकेटची गरज होती. या षटकात एक चेंडू श्रीलंकेच्या पथुम निसंकाच्या पॅड्सला लागून यष्टीरक्षक के एल राहुलच्या हातात गेला. त्यानंतर लगेच केएल राहुलने कर्णधार रोहित शर्माकडे धाव घेतली आणि एक प्रश्न विचारला. 

आंतरराष्ट्रीय सामन्यांत आयपीएलमधील नियम आहे का? असा सवाल त्याने कर्णधार रोहित शर्माला केला. रोहित शर्मा-केएल राहुल तसेच इतर भारतीय खेळाडू यांच्यातील संभाषण स्टंप्सवर असलेल्या माईकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. विशेष म्हणजे सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग चालू असताना हे संभाषण सर्वांनी ऐकले. याच संभाषणाच्या काही क्लिप्स सध्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. के एल राहुलच्या या प्रश्नावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 

राहुलने आयपीएलच्या नियमाची का विचारणा केली? 

आंतरराष्ट्रीय सामन्यात राहुलने आयपीएलच्या नियमाबाबत का विचारणा केली? असा प्रश्न विचारला जातोय. पंचाने एखाद्या चेंडूला वाईड असल्याचा निर्णय दिल्यास त्याच्या निर्णयाला आव्हान देता येते.  डीआरएसच्या मदतीने हे आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे हाच नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांत लागू होतो की नाही? याची के एल राहुलने विचारणा केली. आयपीएलचे काही नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांत लागू होत नाहीत. याच कारणामुळे के एल राहुलला अनेकजण ट्रोल करत आहेत.  

पहिला सामना ड्रॉ

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील यांच्यातील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ड्रॉ झाला. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताच्या रोहित शर्मा वगळता अन्य कोणत्याही खेळाडून खास कामगिरी केली नाही. त्यामुळे सर्व गडी बाद झाले तेव्हा 230 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला.  

हेही वाचा :

तो बाद नव्हता तरी सोडलं मैदान, जनिथ लियानगेच्या निर्णयामुळे श्रीलंकचे सगळेच खेळाडू चकित; नेमकं काय घडलं?

Video : तिनं गोल्ड मेडल जिंकलं अन् सहकाऱ्याने थेट लग्नाची मागणी घातली, ऑलिम्पिकच्या मैदानात जुळले सात जन्माचे नाते!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget