एक्स्प्लोर

गोलंदाजी करताना दोनदा अडखळला...रोहित शर्मा थेट वॉशिंग्टन सुंदरला मारायला धावला, Video

IND VS SL: श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता.

IND VS SL: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना कोलंबोमध्ये खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला. या विजयासह चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. 

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. श्रीलंकेला 50 षटकांत 9 बाद 240 धावांवर रोखल्यानंतर भारताचा डाव 42.2 षटकांत 208 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार रोहित शर्माने 44 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह 64 धावांची आक्रमक खेळी केल्यानंतरही भारताला पराभूत व्हावे लागले. श्रीलंकेचा फिरकीपटू जेफ्री वेंडरसे याने 33 धावांत 6 विकेट्स घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. याचदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या दिशेने मारायला धावत असल्याचे दिसून येत आहे. 

नेमकं काय घडलं?

सामन्यात गोलंदाजीसाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदर चेंडू टाकण्यापूर्वी सलग दोन वेळा रनअप घेऊन चेंडू न टाकताच थांबला. गोलंदाजी करताना दोन दोनदा अडखळला. त्यामुळे स्लिपला उभा असलेला रोहित शर्मा चांगलाच वैतागला. यानंतर तो गमतीने वॉशिंग्टन सुंदरच्या दिशेने त्याला मारायला धावला. हे पाहून यष्टीरक्षक केएल राहुलसह वॉशिंग्टन सुंदरलाही हसू आले. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टीम इंडिया 32 धावांनी पराभूत-

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी सादर केली. वॉशिंग्टन सुंदरने 10 षटकांत केवळ 30 धावांत 3 फलंदाज बाद केले. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने 50 षटकांत 9 गडी गमावून 240 धावा केल्या. अशाप्रकारे भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य होते, मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा डाव 42.2 षटकात 208 धावांवरच संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने झंझावाती अर्धशतक झळकावले, पण इतर फलंदाजांना साथ मिळाली नाही. परिणामी भारतीय संघाला 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मा या पराभवाबाबत बोलताना म्हणाला की जेव्हा तुम्ही मॅचमध्ये पराभूत होता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट दु:खी करत असते. फक्त 10 ओव्हरची गोष्ट नसते, जेव्हा तुम्हाला मॅच जिंकायची असते तेव्हा सातत्य राखायला लागतं.आम्ही सातत्य राखण्यात अपयशी ठरलो, थोडा निराश झालो आहे, मात्र असं होतं असतं, तुमच्या समोर जे आहे ते बदलायचं असतं. आम्हाला वाटलं डाव्या उजव्या फलंदाजाची जोडी फायदेशीर ठरेल. मात्र वेंडरसेनं चांगली कामगिरी केली, त्यानं सहा विकेट घेतल्या, असं रोहित म्हणाला. आक्रमक फलंदाजी केल्यामुळं 64 धावा केल्या, मी माझं धोरण बदलणार नसल्याचं देखील तो म्हणाला. आम्हाला या खेळपट्टीची माहिती आहे, मधल्या षटकात खेळणं अवघड होऊन जातं. त्यामुळं पॉवरप्लेमध्ये अधिक धावा करण्याचा प्रयत्न केला, असं रोहित शर्माने सांगितले.

संबंधित बातमी:

IND vs SL: टीम इंडियाचा पराभव होताच गौतम गंभीरचा चेहरा पडला; रिॲक्शन सोशल मीडियावर व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
Embed widget