Ind vs SL, 1st T20I Live: श्रीलंकेला भारताचे 165 धावांचे लक्ष्य; सूर्यकुमार यादवचं अर्धशतक
India Vs Sri Lanka, 1 T20 International Live Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.
श्रीलंकेला भारताचे 165 धावांचे लक्ष्य; सूर्यकुमार यादवची अर्धशतक
भारताला चौथा झटका, शिखर धवननंतर सूर्यकुमार यादव 50 धावा करुन बाद, टीम इंडियाचा स्कोर 16 ओव्हर्समध्ये 130 धावा
टीम इंडियाचा स्कोर 12 ओव्हर्समध्ये 100 पार, शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव क्रिजवर
तीन षटकानंतर 18 धावा. धवन आणि सॅमसन काळजीपूर्वक फलंदाजी करत आहेत. पहिल्या बॉलवर विकेट गमावल्याने भारताला पॉवर प्लेचा चांगला फायदा घेता येत नाहीय.
सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला. डेब्यू मॅन पृथ्वी शॉ खाते न उघडताच बाद झाला. त्याला दुश्मंता चामिराने बाद केले. शॉ विकेटच्या मागे झेलबाद झाला. आता त्याच्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन फलंदाजीसाठी आला आहे.
आज रात्री 8 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे.
पार्श्वभूमी
Sri Lanka vs India 1st T20 : वनडे सीरीज आपल्या नावे केल्यानंतर आता शिखर धवनच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी20 सीरिजमध्येही आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी मैदानावर उतरणात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या टी20 मालिकेतील पहिला सामना आज रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येईल.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूंचा टीम इंडियामध्ये समावेश आहे. त्यामुळे आजचा सामना खिशात घालून श्रीलंकेविरोधातील टी20 मालिकेची सुरुवात विजयानं करण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असणार आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि हार्दिक पांड्या यांच्यासारखे स्टार खेळाडूंसह आज टीम इंडिया श्रीलंकेविरोधात मैदानावर उतरेल.
आज वरुण चक्रवर्ती खेळू शकतो पदार्पणाचा सामना
शिखर धवनच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकानं खिशात घातली. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामन्यात पराभवाचा सामना करुनही टीम इंडियाचं पारड जड दिसून आलं. प्रशिक्षक राहुल द्रविड या मालिकेत वरुण चक्रवर्तीचा संघात समावेश करु शकतो. वरुण ऑफ ब्रेक, कॅरम बॉल आणि उजव्या हातानं फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांसाठी लेग ब्रेकही करु शकतो. आयपीएलमध्ये आपलं हेच कसब वापरुन वरुणनं भल्या भल्या फलदांजांची विकेट घेतली होती.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन करणार सुरुवात
श्रीलंकेविरोधातील पहिल्या टी20 सामन्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ही जोडी फलंदाजीसाठी मैदानावर उतरेल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव बॅटिंग करु शकतो. त्यानंतर संजू सॅमसनला संधी मिळू शकते. तसेच पांड्या ब्रदर्स फिनिशर म्हणून भूमिका निभावतील. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर ही जोडी अॅक्शन मोडमध्ये दिसू शकते.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -