एक्स्प्लोर

World Cup 2023 : नाणेफेक रोहित शर्माने जिंकली, भारताची प्रथम फलंदाजी

IND vs SA LIVE Score, World Cup 2023 : कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs SA LIVE Score, World Cup 2023: कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ सातव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. टेबल टॉपरमध्ये कोण बाजी मारणार.. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

दक्षिण आफ्रिकेच्या संघात एक बदल करण्यात आलाय. आफ्रिकेने ईडन गार्डन मैदानावर तरबेज शम्सीला स्थान देण्यात आलेय. रोहित शर्माने संघात कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवलाय. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा 'बर्थडे बॉय' विराट कोहलीवर असतील. कोहलीला सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करायची आहे. मात्र, आफ्रिकन संघाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँडविरुद्धचा एक सामना वगळता 6 सामने जिंकले आहेत. तर, टीम इंडियानं आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत सर्व सामने जिंकले आहेत. तसेच, वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमध्ये सध्या टीम इंडिया पहिल्या स्थानावर कायम आहे. 

टीम इंडियाची  प्लेईंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिकेचा  प्लेईंग-11
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यानसन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

भारत-दक्षिण आफ्रिकेचा हेड टू हेड रेकॉर्ड 
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं 3 आणि टीम इंडियानं 2 विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 90 सामन्यांपैकी टीम इंडियानं 37 आणि दक्षिण आफ्रिकेनं 50 सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले.

 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget