IND vs SA: 'तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर...' टीम इंडियात परतलेल्या दिनेश कार्तिकचं ट्वीट होतंय व्हायरल
IND vs SA: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.
IND vs SA: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात काही युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर अनेक गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी धडपड करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे. या यादीत दिनेश कार्तिकचंही (Dinesh Karthik) नाव आहे. आयपीएलच्या पंधरावा हंगाम दिनेश कार्तिकसाठी चांगला ठरला आहे. पंजाबसाठी फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या या खेळाडूनं 57. 40 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध संघात स्थान मिळाल्यानंतर दिनेश कार्तिक एक ट्वीट केलंय. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
दिनेश कार्तिक ट्विटमध्ये काय म्हणाला?
भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर दिनेश कार्तिक एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यानं असं म्हटलंय की, "जर तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर सर्व काही ठीक होईल. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार... कठोर परिश्रम सुरूच आहेत..."
ट्वीट-
दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय कामगिरी
दिनेश कार्तिकनं त्याच्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत भारताकडून फक्त 32 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानं 2006 मध्ये वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्यानं 28 चेंडूत 31 धावा केल्या. या सामन्यात त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आलं होतं.
बंगळुरूसाठी दिनेश कार्तिकची दमदार खेळी
कार्तिकनं यंदाच्या हंगामात 14 सामन्यांमध्ये 57.40 च्या सरासरीनं आणि 191.33 च्या स्ट्राइकरेटनं 287 धावा केल्या आहेत. या काळात कार्तिकची नाबाद 66 सर्वोत्तम धावसंख्या आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक स्ट्राईकरेटनं फलंदाजी करणारा दिनेश कार्तिक एकमेव फलंदाज आहे.
भारतीय टी-20 संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
हे देखील वाचा-




















