IND vs SA, 4th T20 Live : भारताचा मोठा विजय, 82 धावांनी दक्षिण आफ्रिकेला मात

IND vs SA, 4th T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेत सध्या टीम इंडिया 2-1 च्या फरकाने पिछाडीवर आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jun 2022 10:24 PM
IND vs SA, Live : टीम इंडियाचा 82 धावांनी मोठा विजय

87 धावांत दक्षिण आफ्रिकेला रोखत भारताने सामना 82 धावांनी जिंकला आहे. आता मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे.

IND vs SA, Live : आठवा गडीही बाद

दक्षिण आफ्रिकेचा आठवा गडीही तंबूत परतला आहे. चहलने त्याला बाद केलं आहे.

IND vs SA, Live: भेदक आवेश खान, द. आफ्रिकेचा सातवा गडी बाद

आवेश खानने सामन्यातील चौथी विकेट घेत केशव महाराजला शून्यावर तंबूत धाडलं आहे.

IND vs SA : भारताची विजयाकडे आगेकूच, दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का

मार्को जानसेनच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का बसलाय. जानसेन 12 धावा काढून बाद झाला. 

दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, डुसेन बाद

डुसेनच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का बसलाय. आवेश खान याने डुसेनला 20 धावांवर बाद केले.

IND vs SA : डेविड मिलर बाद, दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का

हर्षल पटेल याने डेविड मिलरला बाद करत दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का दिला. मिलर 9 धावा काढून बाद झाला. 

IND vs SA : चहलकडून क्लासेन बाद

युजवेंद्र चहलने आजही महत्त्वाची विकेट घेत हेनरिच क्लासेनला तंबूत धाडलं आहे.

IND vs SA, Live : 8 षटकानंतर द. आफ्रिका 41/2

8 षटकानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 41 वर 2 बाद झाला आहे.

IND vs SA, Live : आवेशने टीपला दुसरा बळी

आवेश खानने ड्वेन प्रिटोरियसला बाद करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं आहे.

IND vs SA, Live : क्विंटन डी कॉक बाद, हर्षलने घेतली विकेट

हर्षल पटेलने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. त्याने क्विंटन डी कॉकला बाद केलं आहे.

IND vs SA, Live : 3 षटकानंतर दक्षिण आफ्रिका 20/0

3 षटकानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 धावा केल्या असून त्यांचा एकही गडी बाद झालेला नाही.

IND vs SA, Live : द. आफ्रिकेसमोर 170 धावांचे लक्ष्य

भारताने कार्तिक आणि पांड्या जोडीच्या मदतीने 169 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यामुळे विजयासाठी द. आफ्रिकेला 170 धावा करायच्या आहेत.

IND vs SA, Live : दिनेश बाद

दमदार अर्धशतक झळकावल्यानंतर अखेर दिनेश कार्तिक प्रिटोरियसच्या चेंडूवर झेलबाद झाला आहे.

IND vs SA, Live : दिनेशचं दमदार अर्धशतक पूर्ण

टीम इंडियाचा एक सर्वात जुना टी20 खेळाडू असणाऱ्या दिनेशनं अखेर आज जाऊन पहिलं वहिलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 26 चेंडूत त्याने 55 धावा केल्या.

IND vs SA, Live : हार्दिक 46 धावांवर बाद

हार्दिक पांड्याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं आहे. 46 धावांवर इंगिडीने त्याला बाद केलं आहे.

IND vs SA, Live : भारताला पाचवा धक्का, हार्दिक पांड्या बाद

हार्दिक पांड्याच्या रुपाने भारताला पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याने 31 चेंडूत 46 धावांची खेळी केली.  

IND vs SA, Live : दिनेश कार्तिकची दमदार फलंदाजी

आयपीएल गाजवणारा दिनेश कार्तिक आजही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून त्याच्या मदतीने संघाने 16 व्या षटकात 15 धावा ठोकल्या आहेत.

IND vs SA, Live : कर्णधार पंत बाद

कर्णधार ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या टीम इंडियाचा डाव सावरत आहेत, असे वाटत असतानाच पंत महाराजच्या चेंडूवर 17 धावा करुन बाद झाला आहे. 

IND vs SA, Live : ईशान किशनही बाद

चांगल्या लयीत दिसणारा ईशान किशनही 27 धावा करुन बाद झाला आहे. नॉर्खियाने त्याला बाद केलं आहे.

IND vs SA, Live : नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने घेतली गोलंदाजी

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तिसरा टी20 सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशनच्या मैदानात ( Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून आफ्रिकने नाणेफेक जिंकत गोलंदाजी घेतली आहे.

IND vs SA, Live : कशी असू शकते दक्षिण आफ्रिकेची अंतिम 11?

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य अंतिम 11 - टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया. 


 

IND vs SA, Live : कशी असू शकते टीम इंडिया?

भारताची संभाव्य अंतिम 11 - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान.

IND vs SA, Live : आज रंगणार चौथा सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेत सध्या टीम इंडिया 2-1 च्या फरकाने पिछाडीवर आहे. आज चौथा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील.

पार्श्वभूमी

IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तिसरा टी20 सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशनच्या मैदानात ( Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) खेळवला जात आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारत आज विजय मिळवून मालिकेती आपले आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिका विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या तयारीत आहे. दोन्ही संघाना आज विजय अत्यंत महत्त्वाचा असल्याने एक चुरशीचा सामना आज पाहायला मिळू शकतो.


आजचा सामना होणाऱ्या मैदानाचा विचार करता या मैदानावर झालेल्या याआधीच्या सामन्यांत खेळपट्टी फलंदाजासाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे आज एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. याआधी या मैदानात केवळ दोन आंतरराष्ट्रीय सामने झाले असून या सामन्यातील धावसंख्या पाहता आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो. त्यात फलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकूल असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेऊन एक अत्यंत मोठे टार्गेट समोरच्या संघाला देण्याच्या तयारीत असणार आहे.


दोन्ही संघाची संभाव्य अंतिम 11


भारत - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान.


दक्षिण आफ्रिका - टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया. 


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.