![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार, केशव महाराजने भारताला दिले लागोपाठ दोन धक्के
Tilak Varma Golden Duck : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि निर्णायक टी 20 सामना सुरु आहे. या सामन्यात युवा फलंदाज तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार ठरला.
![तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार, केशव महाराजने भारताला दिले लागोपाठ दोन धक्के ind vs sa 3rd t20i tilak varma golden duck keshav maharaj back to back wicket तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार, केशव महाराजने भारताला दिले लागोपाठ दोन धक्के](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/14/52ebf133050bfba0963f247c34cd68271702571308985265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tilak Varma Golden Duck : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि निर्णायक टी 20 सामना सुरु आहे. या सामन्यात युवा फलंदाज तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट फेकली. फिरकी गोलंदाज केशव महाराज याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या सामन्यात निर्णायक खेळी करणाऱ्या तिलक वर्माला अखेरच्या सामन्यात प्रभावी फलंदाजी करता आली नाही.
शुभमन गिल माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने मैदानात येताच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न केला, पण तो बाद झाला. तिलक वर्मिाने केशव महाराजचा चेंडू मिड-ऑफच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सर्कलच्या बाहेरही गेला नाही. चेंडू थेट कॅप्टन मार्करामच्या हातात विसावला. अशाप्रकारे तिलक वर्माला खाते न उघडताच तंबूत परत जावं लागलं.
केशव महाराजने लागोपाठ दोन धक्के दिले..
टीम इंडियाने 'करो या मरो'च्या सामन्यात वेगवान सुरुवात केली. यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल यांनी पहिल्या दोन षटकात 29 धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने चेंडू केशव महाराज याच्याकडे सोपवाला. केशव महाराजने येताच लागोपाठ दोन विकेट घेतल्या. पहिल्या चेंडूवर त्याने शुभमन गिल याला तंबूत धाडले, तर त्यानंतर शून्यावर तिलक वर्माला तंबूचा रस्ता दाखवला. शुभमन गिलने महाराजचा चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला अन् एलबीडब्ल्यू बाद झाला. शुभमन गिल याने सहा चेंडूत 12 धावांची खेळी केली. तिलक वर्माला खातेही उघडता आले नाही.
Golden duck for Tilak Varma. pic.twitter.com/5HegIAvFKd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 14, 2023
निर्णायक सामना -
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील आज निर्णायक सामना आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसरा सामना दक्षिण आफ्रिकाने जिंकला. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियासाठी करो या मरो असाच आहे. आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यान टीम इंडिया मैदानात उतरली आहे. तर आफ्रिकेचा संघ मालिका जिंकण्यासाठी खेळत आहे. मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही किंमतीला सामना जिंकावाच लागेल.
भारतीय संघाची प्लेईंग 11
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 -
रीजा हेंड्रिक्स, मैथ्यू ब्रीट्जके, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, लिज़ाद विलियम्स, तबरेज शम्सी, नंदरे बर्गर, डोनोवन फरेरा, केशव महाराज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)