IND vs SA, 1st Inning Highlights : भारतीय फलंदाज सध्या तुफान फॉर्मात दिसत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 237 धावांचा डोंगर उभारत दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धाावंचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून  सूर्या आणि राहुलने अर्धशतक ठोकलं तर शर्मा आणि कोहली यांनीही जबरदस्त खेळ दाखवला. आता आफ्रिकेला विजयासाठी 20 षटकांत 238 धावा करायच्या आहेत. 






 


सामन्यात सर्वप्रथम दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य लवकर पूर्ण करण्याचा त्यांचा डाव होता. पण हा डाव भारतीय फलंदाजांनी उधळून लावला. सुरुवातीपासूनच भारताने तुफान फलंदाजी केली. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी तडाखेबाज फलंदाजी करत अगदी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. पण नंतर रोहित 43 धावा करुन तर केएल राहुल अर्धशतक पूर्ण करुन  57 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारने नावाला साजेशी 61 धावांची तडफदार खेळी केली. तर विराट कोहवी 49 धावांवर नाबाद राहिला. कार्तिकनेही नाबाद 17 धावा करत भारताची धावसंख्या 237 पर्यंत पोहोचवली. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 20 षटकांत 238 धावा करायच्या आहेत. 

 

भारताकडून अंतिम 11 मध्ये कोणाताही बदल नाही

 

भारताने पहिल्या उत्तम खेळ दाखवत 8 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी अर्शदीप आणि दीपकने भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सळो की पळो केलं. त्यानंतर फलंदाजीत राहुल आणि सूर्याने दमदार फलंदाजी करत सहज विजय मिळवून दिला. त्यामुळेच भारताने दुसऱ्या सामन्यावेळी संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने केवळ एक बदल केला असून तबरेद शम्सीच्या जागी लुंगी एनगिडी संघात आला आहे.

 

भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रवीचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर


दक्षिण आफ्रिका संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक,रिले रोस्सू, केशव महाराज, एडन मार्कराम, डेविड मिलर, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, लुंगी एनगिडी, ट्रिस्टन स्टब्स आणि कागिसो रबाडा 




हे देखील वाचा -