IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमवर सुरु दुसऱ्या टी20 सामन्यात मैदानातच साप आढळून आल्याचं दिसून आलं. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्याने भारत फलंदाजी करत होता, भारताची फलंदाजी सुरु असतानाच अचानक मैदानात साप आढळून आल्याचं धक्कादायक दृश्य दिसून आलं. आठवी ओव्हर सुरु असताना भारताचा सलामीवीर केएल राहुलचं लक्ष अचानक मैदानात आलेल्या सापाकडे गेलं, ज्यानंतर काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता. पण काही वेळातच सापाला  काढण्यात आल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला. अनेक नेटकऱ्यांनी या सापाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं दिसून आलं आहे.





सामन्याचा विचार करता भारताने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी तुफानी फलंदाजी करत अगदी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. पण नंतर रोहित 43 धावा करुन तर केएल राहुल अर्धशतक पूर्ण करुन  57 धावांवर बाद झाला. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतीलस पहिला सामना भारताने 8 विकेट्सच्या फरकाने जिंकत भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ आपलं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. त्यांनी सामना जिंकल्यास मालिकेत दोघेही 1-1 अशी बरोबरी घेतील. 


कसे आहेत दोन्ही संघ?

 

भारताने पहिल्या उत्तम खेळ दाखवत 8 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी अर्शदीप आणि दीपकने भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सळो की पळो केलं. त्यानंतर फलंदाजीत राहुल आणि सूर्याने दमदार फलंदाजी करत सहज विजय मिळवून दिला. त्यामुळेच भारताने दुसऱ्या सामन्यावेळी संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने केवळ एक बदल केला असून तबरेद शम्सीच्या जागी लुंगी एनगिडी संघात आला आहे.

 

भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रवीचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर


दक्षिण आफ्रिका संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक,रिले रोस्सू, केशव महाराज, एडन मार्कराम, डेविड मिलर, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, लुंगी एनगिडी, ट्रिस्टन स्टब्स आणि कागिसो रबाडा 



हे देखील वाचा -