Sandeep Lamichhane Facebook Post : नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार आणि युवा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याने अवघ्या 17 व्या वर्षी आयपीएल खेळत मागील काही वर्षात चमकदार कामगिरी केली आहे. 22 वर्षाच्या वयात तो राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. पण काही दिवसांपूर्वीच त्याच्या विरोधात 17 वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर आता संदीपनं आपली प्रतिक्रिया देत फेसबुक पोस्ट केली आहे. यावेळी तो 6 ऑक्टोबरला मायदेशात (नेपाळ) परतत असून माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असंही त्यानं म्हटलं आहे.


'मी निर्दोष आहे आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे'


संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, पर लिखा, "मी मोठ्या आशेने आणि विश्वासाने सांगत आहे की मी 6 ऑक्टोबर, 2022 रोजी नेपाळमध्ये परतत आहे. खोट्या आरोपांविरुद्ध लढण्यासाठी मी स्वत:ला नेपाळ सरकारकडे स्वाधीन करत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की मी निर्दोष आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की नेपाळची न्यायव्यवस्था मला योग्य न्याय देईल. माझ्या सर्व चाहत्यांना मी सांगू इच्छितो की मी निर्दोष आहे.  



आयपीएल खेळणारा एकमेव नेपाळचा क्रिकेटपटू


संदीप लामिछानं नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो नेपाळचा एकमेव खेळाडू आहे, जो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळलाय. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछानं नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीगसह अनेक लीगमध्ये खेळत आहे. विशेष म्हणजे संदीप लामिछानेनं 17 व्या वर्षीच आयपीएलचा पहिला सामना खेळला होता.  दिल्लीच्या संघानं 2018 मध्ये संदीप लामिछानला 20 लाखात खरेदी केलं होतं. संदीपनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संदीपनं नेपाळसाठी 44 टी-20 सामन्यात 85 विकेट्स घेतल्या आहेत. 



हे देखील वाचा-