IND vs SA, 2nd T20, Weather Report : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs SA 2nd T20) आज खेळवला जात आहे. भारताने पहिला सामना जिंकत मालिकेत भारताने1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने आजचा सामना जिंकल्यास टीम इंडिया मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेईल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आज सामना जिंकण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यात पावासाचा व्यत्यय येण्याची शक्यता समोर येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार गुवाहाटीमध्ये आज पावसाटी चिन्ह दिसून येत आहेत. तर नेमकी हवामानाची स्थिती कशी आहे, पाहूया...


Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या सामन्यादरम्यान गुवाहाटीमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. गुवाहाटीमध्ये दिवसाच्या वेळी पाऊस पडण्याची 6 टक्के शक्यता आहे. तर हीच शक्यता संध्याकाळपर्यंत 40 टक्क्यांपर्यंत वाढेल. दिवसभर ढगाळ वातावरण आणि तापमान 35 अंशांच्या आसपास राहील. तसंच दिवसाचे किमान तापमान 27 अंश राहील. सामना सुरु असताना  पाऊस येऊ शकतो आणि सामना मधेच थांबवला देखील जाऊ शकतो, अशी शक्यता असून 24 किमी वेगाने वारे देखील वाहतील. 


कधी, कुठे पाहू शकता सामना?


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी20 सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याच लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


कशी असू शकते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर


हे देखील वाचा -