IND Vs SA, 2nd ODI LIVE Score: दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात विकेटने विजय
India Vs South Africa 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण यांच्यात आज दुसरा एकदिवसीय मालिका खेळला जात आहे.
LIVE
Background
India Vs South Africa 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण यांच्यात आज दुसरा एकदिवसीय मालिका खेळला जात आहे. हा सामना बोलंड पार्क, पर्ल (Boland Park, Paarl) येथे खेळला जाणार आहे. दरम्यान, तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. यामुळं एकदिवसीय मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पर्लच्या बोलँड पार्क स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. तर, टॉस 1 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. भारत वि दक्षिण आफ्रिका पहिला वनडे सामना तुम्ही लाईव्ह स्टार स्पोर्ट्स 1/1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी/ 1 एचडी हिंदीवर पाहू शकता. भारत वि दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.
संघ-
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, दीपक चहर, सूर्यकुमार यादव, , नवदीप सैनी, इशान किशन, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, रुतुराज गायकवाड
दक्षिण आफ्रिका संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), जेनेमन मलान, टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, सिसांडा मगला, झुबेर हमझा, काइल वेरेन
हे देखील वाचा-
- IND Vs SA: एकदिवसीय मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक
- INDvsPAK : 23 ऑक्टोबरला मौका, मौका... क्रिकेटच्या मैदानावर हायव्होल्टेज सामना, टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार
- ICC T20 World Cup 2022 : आयसीसीकडून टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचं शेड्यूल पाहा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजी
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा सात विकेटने पराभव केला. भारताने दिलेलं 288 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केलं. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यामुळे कसोटीनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही गमावली.
भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 288 धावांचं लक्ष्य
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 288 धावांचं लक्ष्य दिलंय.
केएल राहुल आणि रिषभ पंत यांच्यात शंभर धावांची भागीदारी
केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी संयमी खेळी करत शंभर धावांची भागीदारी केलीय. दोन्हीही फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत.
भारताची दुसरी विकेट्स, विराट कोहली शून्यावर बाद
शिखेर धवननंतर विराट कोहली चक्क शून्यावर बाद झालाय. यामुळं भारताला मोठा धक्का बसलाय. भारताचा स्कोर- 64/2 (12.4)
भारताला पहिला झटका, सलामीवीर शिखर धवन बाद
शिखर धवनच्या रुपात भारताला पहिला झटका लागलाय. शिखर धवननं या सामन्यात 29 धावा केल्या आहेत. भारताचा स्कोर- 63/1 (11.4)