एक्स्प्लोर
Advertisement
IND vs SA, 2nd ODI, Inning Highlights : हेंड्रीक्स-मार्करमची दमदार अर्धशतकं, भारतासमोर 279 धावांचे आव्हान
IND vs SA, 2nd ODI, 1st Inning : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे सुरु असलेल्या दुसरा एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी झाली असून आता भारत फलंदाजीला मैदानात येत आहे.
IND vs SA, 2nd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी आटोपली असून त्यांनी 50 षटकांत 6 गडी गमावत 278 रन स्कोरबोर्डवर लावले आहेत. ज्यामुळे आता भारताला विजयासाठी 279 रन करायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून मार्करम आणि रीझा हेंड्रीक्स यांनी दमदार अशी अर्धशतकं ठोकत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. ज्यामुळे त्यांनी 278 धावापर्यंत मजल मारली आहे.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार टेम्बाच्या जागी केशव महाराज कर्णधारपद सांभाळत असल्याने सलामीला डी कॉक आणि जनेमान मलान आले. डी कॉकला 5 धावांवर सिराजनं तंबूत धाडलं. मलानलाही शाहबाजनं स्वस्तात माघारी धाडलं. पण नंतर एडन मार्करमने रीझा हेंड्रीक्ससोबत मिळून दमदार अशी शतकी भागिदारी केली. रीझाने 74 तर मार्करमने 79 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर क्लासेनने 30 तर मिलरने नाबाद 35 धावांंचं योगदान देत संघाची धावसंख्या 278 पर्यंत नेली. ज्यामुळे आता भारताला विजयासाठी 50 षटकात 279 धावा करायच्या आहेत.
प्रत्येकी दोन बदलांसह दोन्ही संघ मैदानात
आजच्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघात प्रत्येकी दोन बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा संघात नसून केशव महाराज कर्णधार आहे. दरम्यान टेम्बा बावुमा आणि तबरेज शम्सी या दोघांना ठिक वाटत नसल्याने आज ते सामन्यात नसून रीझा हेंड्रिक्स आणि ब्योर्न फॉर्च्युइन यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे दीपक चाहर दुखापतीमुळे दौऱ्याबाहेर गेल्यानंतर भारतीय संघात आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला टीम इंडियात जागा मिळाली असून शाहबाज अहमदही संघात आहे. रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड यांना विश्रांती दिली गेली आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ -
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर.
दक्षिण आफ्रिका संघ - जनेमान मलान, क्विंटन डी कॉक, केशव महाराज (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरीक क्लासेन, डेविड मिलर, वेन पारनेल, एनरिक नॉर्टेजे, कागिसो रबाडा आणि ब्योर्न फॉर्च्युइन
हे देखील वाचा-
Shahbaz Ahmed: शाहबाज अहमदचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण; आयपीएल गाजवलं, आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दाखवणार दम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement