Jasprit Bumrah Ruled Out: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झालीय.या मालिकेतील पहिला सामना तिरुअनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर (Greenfield International Stadium) खेळवला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्यात आल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय. सराव दरम्यान जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात खेळण्यात नसल्याचं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलंय.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सराव करताना जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली, ज्यामुळं संघ व्यवस्थापनानं त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्याच्याऐवजी वेगवान युवा गोलंदाज दीपक चहरला संघात स्थान देण्यात आलंय. दुखापतींशी झुंजणाऱ्या जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून संघात पुनरागमन केलं होतं. त्याची दुखापत किरकोळ असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. यामुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उर्वरित दोन सामन्यात जसप्रीत बुमराह चेंडूनं चमत्कार दाखवण्यासाठी सज्ज होईल, अशी अपेक्षा आहे.
बीसीसीआयचं ट्वीट-
जसप्रीत बुमराहची दुखापत चिंता वाढवणारी
भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळं संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावं लागलंय. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या दुखपतीनं टीम इंडियाची चिंता वाढवली आहे.
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शाम्सी.
हे देखील वाचा-