IND vs SA 1st T20I: ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत धुळ चारल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज तिरुअनंतपुरम येथे पार पडणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) भारताचा कर्णधार रोहित शर्माला मागं टाकण्याची संधी उपलब्ध झालीय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत रोहित शर्मा टॉपवर आहे. तर, विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. 

आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 3 हजार 694 धावांची नोंद आहे. तर, विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 107 सामन्यात 3 हजार 660 धावा केल्या आहेत. दरम्यान, रोहित शर्माला मागं टाकण्यासाठी विराट कोहलीला फक्त 35 धावांची गरज आहे. या यादीत न्यूझीलंड तडाखेबाज फलंदाज मार्टिन गप्टिल 3 हजार 497 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 3 हजार 11 धावांसह चौथ्या आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 2 हजार 939 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 

आंतरराष्ट्रीय टी-20 सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-

क्रमांक फलंदाज देश धावा
1 रोहित शर्मा भारत 3 हजार 694
2 विराट कोहली भारत 3 हजार 660
3 मार्टिन गप्टिल न्यूझीलंड 3 हजार 497
4 पॉल स्टर्लिंग आयर्लंड 3 हजार 11
5 बाबर आझम पाकिस्तान 2 हजार 939

 

विराट कोहली फॉर्ममध्ये परतला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी पार पडलेल्या आशिया चषकात विराट कोहलीनं आपल्या जुन्या अंदाजात फलंदाजी केली. जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीनं अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिलं शतकं झळकावलंय. विराट कोहलीचं पुन्हा फॉर्ममध्ये परतणं, भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा केली जात आहे. 

हे देखील वाचा-