IND vs SA, T20 Wolrd Cup 2022: टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर आलीय. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammad Shami) कोरोना मुक्त झालाय. स्वत: मोहम्मद शामीनं सोशल मीडियाद्वारे कोरोनावर मात केल्याचं सांगितलंय. कोरोनाची लागण झाल्यानं मोहम्मद शामीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेला मुकावं लागलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेतूनही त्याला बाहेर पडावं लागलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत शामीऐवजी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आलंय.
ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचकात मोहम्मद शामीची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी-20 मालिकेत मोहम्मद शामीची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु, त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेला मुकावं लागलं होतं.त्यानंतर त्याला आता दक्षिण आफ्रिका मालिकेतूनही बाहेर व्हावे लागले आहे. बीसीसीआयने आज त्याच्या बदलीची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर काही तासांनंतर शमीची कोविड चाचणी निगेटिव्ह येणx ही निश्चितच संघासाठी दिलासा देणारी बातमी आहे. परंतु, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला संघात स्थान मिळणार की नाही? हा प्रश्न उपस्थित झालाय.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघात तीन बदल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि युवा ऑलरांऊडर शाहबाज अहमद यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. मोहम्मद शमीशिवाय दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या मालिकेतून बाहेर पडलेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद.
हे देखील वाचा-