IND vs SA 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आजपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत दीपक हुडा (Deepak Hooda), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar kumar) आणि भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचा भाग नाही. हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनं (Wasim Jaffer) मोठी प्रतिक्रिया दिलीय. हार्दिक पांड्याची अनुपस्थिती भारतीय संघासाठी घातक ठरू शकते. हार्दिक पांड्या चांगल्या फलंदाजीही भारतीय संघात पाचव्या गोलंदाजीचं भूमिका बजावतो, अशी चिंता वसीम जाफरनं व्यक्त केलीय.
वसीम जाफर काय म्हणाला?
क्रिकइंन्फोशी बोलताना वसीम जाफरनं हार्दिक पांड्या आणि युवा फलंदाज दिपक हुडाबाबत भाष्य केलं. "दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याचं नसणं भारतीय संघासाठी अडचण निर्माण करू शकतो. दुखापतीमुळं दीपक हुडाही संघाबाहेर आहे. या गोष्टी रोहित शर्माचं टेन्शन वाढवू शकतात."
जाफरकडून अर्शदीपचं कौतूक
"दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणं गरजेचं आहे. डेथ ओव्हर्समध्ये भारतासमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. अर्शदीप सिंहचं संघात पुनरागमन झाल्यानं हर्षल पटेलला मधल्या षटकात मदत मिळू शकते. महत्वाचं म्हणजे, सर्वांनाच माहिती आहे की, अर्शदीप सिंह डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करतो."
हार्दिक पांड्याची कमतरता जाणवण्याची शक्यता
हार्दिक पांड्या भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावतोय. हार्दिक पांड्यानं मागील काही काळात फलंदाजाहीसह गोलंदाजीतही चांगली सुधारणा केलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत तो भारतीय संघाचा भाग होता. परंतु, आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं त्याला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आलीय. याशिवाय, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल भारतीय गोलंदाजीची जबाबदारी संभाळतील. तसेच उमेश यादवलाही मोहम्मद सिराजच्या जागेवर संधी मिळाली आहे.
भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-