एक्स्प्लोर

IND vs RSA : रविचंद्रन अश्विनचा मार्को जेन्सनला कडक इशारा, 'मंकड'ने बाद करण्याचा प्रयत्न

IND vs RSA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानात खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने 163 धावांची आघाडी घेतली असून आजचा खेळ अजून संपलेला नाही.

IND vs RSA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानात खेळवला जात आहे. सामन्यात सध्या दक्षिण आफ्रिकेने 163 धावांची आघाडी घेतली असून आजचा खेळ अजून संपलेला नाही. दरम्यान, 'मंकड'ने (Mankad) च्या नियमांनुसार विरोधी खेळाडूंना बाद करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रविचंद्रन अश्निनने पुन्हा एकदा ही युक्ती वापरण्याचा प्रयत्न केलाय. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को जेन्सन जलद गतीने धावा काढण्यासाठी क्रिजच्या बाहेर पडला होता. त्यानंतर अश्विनने त्याला इशारा देऊन क्रिजच्या आत राहण्याचा इशारा दिला आहे. अश्विनने इशारा देताच मार्को जेन्सन माघारी परतला. 

98 व्या षटकात  'मंकड'ने बाद करण्याचा प्रयत्न (Mankad)

रविचंद्रन अश्विनने मार्को जेन्सला 98 व्या षटकात बाद करण्याचा प्रयत्न केला. अश्विन दरवेळीप्रमाणे चेंडू टाकत असताना थांबला आणि त्याने मंकडच्या नियमानुसार बाद करण्याचा प्रयत्न केला. अश्विनकडून मंकड करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी 2012 मध्ये श्रीलंकेच्या खेळाडूला अश्विनने अशाच प्रकारे बाद करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय आयपीएलमध्ये जोस बटलरला त्याने याच नियमाने बाद करत तंबूत पाठवले होते. 2019 मध्ये जोस बटलर राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळत असताना अश्विनेने त्याला बाद केले होते. 

दक्षिण आफ्रिकेने घेतली मोठी आघाडी 

भारतीय संघाने (Team India) पहिल्या डावात सर्वबाद 245 धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या आफ्रिकेने  मोठी आघाडी घेतलीये. सध्या आफ्रिकेकडे 163 धावांची आघाडी असून आजच्या दिवसातील खेळ आणखी सुरु आहे. आफ्रिकेकडून डीन एल्गर आणि मोर्को जेन्सनने दमदार कामगिरी केली आहे. डीन एल्गरने 287 चेंडूमध्ये 185 धावांची शतकी खेळी केली तर मार्को जेन्सन 87 धावा करत बाद झाला आहे. मार्को जेन्सन शिवाय डेव्हिड बेंडिमघमनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने 87 चेंडूमध्ये 56 धावा केल्या आहेत. डीन एल्गर आणि मार्को जेन्सनच्या खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 408 धावा केल्या. 

'मंकड' काय आहे? (Mankad)

गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन स्ट्रायकर फलंदाजाने क्रीज सोडली आणि गोलंदाजाने धावचीत केल्यास याला मंकड म्हटले जाते. क्रिकेटच्या इतिहासात 1948 मध्येही या पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याची नोंद आहे. भारतीय क्रिकेटपटू विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाज बिल ब्राऊन यांना अशाच प्रकारे धावचीत केले होते. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी या प्रकाराला 'मंकड' (Mankad) असे नाव दिले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

India Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेचा पहिला 408 धावांवर संपुष्टात; 163 धावांची महत्वपूर्ण आघाडी

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकीचा रोष, कुणाचा दोष; ई केवायसीमुळे किती नाव कपात झाली? Special Report
Anjali Bharati On Amruta Fadnavis: प्रसिद्धीसाठी किती खालची पातळी गाठणार? Special Report
Chandrapur Mahapalika : चंद्रपुरात सत्ता? ठाकरेंकडे पत्ता; ठाकरेंची शिवसेना किंगमेकर Speicial Report
Jitendra Awhad Vs Sahar Sheikh : कैसे हराया VS चॉकलेट लाया; हिरवा, तिरंगा आणि राजकारण Special Report
Zero Hour Full : निवडणुकीनंतर महापौर निवडीची प्रतीक्षा, भाजप काँग्रेसमधील कोणत्या गटाच्या संपर्कात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
Embed widget