Ind vs Pak Match : मोठा ट्विस्ट! हरभजन सिंग, पठाण बंधूंनी पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून घेतली माघार, चाहत्यांमध्ये संताप, नेमकं काय कारण?
India vs Pakistan WCL 2025 : 20 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हाय वोल्टेज सामना चर्चेत आहे आणि भारतीय चाहत्यांमध्ये मोठा राग आणि नाराजी पसरली आहे.

India vs Pakistan WCL 2025 : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) च्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीज, साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू भाग घेत आहेत. 20 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हाय वोल्टेज सामना चर्चेत आहे आणि भारतीय चाहत्यांमध्ये मोठा राग आणि नाराजी पसरली आहे.
🇮🇳 INDIA vs PAKISTAN 🇵🇰⁰The biggest rivalry in cricket is BACK — and it’s happening in just 3 days! 🔥⁰Sunday, 20th July – Legends collide in the World Championship of Legends 2025! 🏏💥
— World Championship Of Legends (@WclLeague) July 16, 2025
Limited seats left — don’t miss history in the making!⁰🎟️ Book your tickets NOW! pic.twitter.com/SAJcSrg5Gq
भारतीय चाहत्यांमध्ये आक्रोश वाढवला
कारण 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानच्या पाठिंब्याखालील दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. ही जखम अजूनही भरलेली नाही, पण वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार असल्याच्या बातमीनं भारतीय चाहत्यांमध्ये आक्रोश वाढवला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने 7 मे रोजी पलटवार केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओके (पाकिस्तान ताब्यातील काश्मीर) मध्ये घुसखोरी करून अनेक दहशतवादी ठिकाणं नष्ट केली. पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यावर भारतानेही जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. 7 ते 10 मे दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धा चांगलेच पेटले होते. शेवटी 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये तात्पुरता शांती करार झाला. एवढ्या गंभीर घटनांनंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे, याने भारतीय चाहत्यांमध्ये मोठा संताप पसरला आहे.
हरभजन सिंह, पठाण बंधूंनी पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून घेतली माघार
पाकिस्तानी संघात शाहिद अफरीदीसारखे खेळाडूही आहेत, ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारताविरुद्ध वादग्रस्त विधानं केली होती. त्यामुळे चाहते सोशल मीडियावर या सामन्याचा जोरदार निषेध करत आहेत आणि भारतीय खेळाडूंनी या सामन्यात भाग न घेण्याची मागणी करत आहेत. मात्र, यामुळे काही मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. भारताच्या काही दिग्गज क्रिकेटपटूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 NO HARBHAJAN SINGH vs PAKISTAN IN WCL 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) July 19, 2025
Harbhajan Singh has Boycotted the match against Pakistan in WCL due to Political reasons. pic.twitter.com/tYNjf7caCj
मीडिया रिपोर्टनुसार, भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने WCL मध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून आपले नाव मागे घेतले आहे. हरभजन याशिवाय इरफान पठाण आणि यूसुफ पठाणनेही हा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात भारतीय संघाने पाकिस्तानला अंतिम फेरीत हरवून जेतेपद जिंकले होते. यंदाही भारतीय संघाचे नेतृत्व युवराज सिंग करत आहेत, तर पाकिस्तान संघाची धुरा मोहम्मद हफीजकडे आहे.
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
— Sportskeeda (@Sportskeeda) July 19, 2025
Harbhajan Singh, Yusuf Pathan, and Irfan Pathan have pulled out of the upcoming WCL clash against Pakistan on Sunday. #WCL2025 #INDvPAK #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/LDiWuzImYo
भारत चॅम्पियन्स : शिखर धवन, सुरेश रैना, अंबाती रायुडू, गुरकीरत मान, युवराज सिंग (कॅप्टन), युसुफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, रॉबिन उथप्पा, हरभजन सिंग, पीयूष चावला, विनय कुमार, सिद्धार्थ कौल, अभिमन्यू मिथुन, वरुण आरोन.
पाकिस्तान चॅम्पियन्स : मोहम्मद हफीज (कॅप्टन), कामरान अकमल, शोएब मलिक, शरजील खान, आसिफ अली, उमर अमीन, आमिर यामीन, वहाब रियाज, सोहेल खान, सोहेल तनवीर, रुम्मन रईस, शाहिद आफ्रिदी, इमाद वसीम, फवाद आलम, सोहैब मकसूद, सरफराज अहमद, युनिस खान, मिस्बाह-उल-हक, अब्दुल रज्जाक, सईद अजमल.





















