IND vs PAK : 'तो जर खरा मर्द असले तर...' वाद थांबता थांबेना! शाहिद आफ्रिदीची पुन्हा जीभ घसरली; भारतीय खेळाडूविरुद्ध ओकले विष
Shahid Afridi On Irfan Pathan : क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तानची शत्रुता नवी नाही, पण यावेळी मैदानाबाहेर दोन माजी खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे.

Shahid Afridi On Irfan Pathan : क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तानची शत्रुता नवी नाही, पण यावेळी मैदानाबाहेर दोन माजी खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी इरफान पठानने एका मुलाखतीत 2006 च्या पाकिस्तान दौऱ्याचा एक मजेदार किस्सा सांगितला होता. त्यातील ‘डॉग मीट’ या वक्तव्यावरून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी संतापला असून त्याने पठानवर थेट वार केला आहे. पण, नेमकं प्रकरण काय आहे, हे समजून घेऊया....
Shahid Afridi accused @IrfanPathan of telling lies and challenged him to a face-to-face discussion. Afridi also claimed Pathan is attempting to prove his loyalty to India while opposing Pakistan.
— Slogger (@kirikraja) September 19, 2025
Who is gonna tell @SAfridiOfficial that Pathan doesn't need to prove anything, as… pic.twitter.com/3ViPYMve43
इरफान पठानचा किस्सा
इरफान पठाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कराचीहून लाहोरला जाताना विमानप्रवासादरम्यान शाहिद अफरीदीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला होता, आणि "कसा आहेस बाळा?" असे विचारले. मात्र इरफानला ही गोष्ट फारशी आवडली नाही. मग त्याने बाजूला बसलेल्या अब्दुल रज्जाककडे पाहत विनोदाने विचारलं, "इथे कसलं मटण मिळतं?" आणि आफ्रिदीकडे बोट दाखवत टोमणा मारला, "यांनी बहुतेक डॉग मीट खाल्लंय, म्हणून इतका वेळ भुंकतोय."
आफ्रिदीचा पलटवार
या घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानी 'समा टीव्ही'वर पठानला खोटारडा ठरवलं. आफ्रिदी म्हणाला की, "अब्दुल रझाकनेही अशा कोणत्याही संभाषणाचा इन्कार केला. मी त्याला मर्द समजतो जो माझ्या समोर उभा राहून बोलेल. मागे मागे बोलत राहणाऱ्याला मी काय उत्तर द्यायचं?"
त्याने पुढे इरफानवर चिमटा काढत म्हटलं, "त्याला असं दाखवायचंय की तो किती महान भारतीय आहे आणि मी पाकिस्तान्यांच्या विरोधात किती आहे. पण त्याचं बिचारं आयुष्यभर हेच सिद्ध करण्यात जाणार आहे की तो किती महान भारतीय आहे."
Shahid Afridi on a News Channel
— Cricket Moments (@cricmomentsonly) September 19, 2025
reponded to remark by Irfan Pathan about Afridi attempts to bully him and his reply to stop barking like dogs.
Do you think Irfan should respond back ?#cricket #bcci #india #pakistan #pcb #INDvPAK #indvpak #AsiaCup2025 #Afridi pic.twitter.com/WT43kfPyoG
पठानच्या गोलंदाजीवर चपराक
यावरच थांबता न राहता अफरीदीनं इरफानच्या खेळावरही तिखट भाष्य केलं. तो म्हणाला, "इरफानला संधी मिळाली ती फक्त त्यामुळे की त्या काळात भारताकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज नव्हते. 120-125 किमी वेगानं टाकणारे गोलंदाज देखील त्यावेळी टीममध्ये खेळायचे."
हे ही वाचा -





















