एक्स्प्लोर

Ind vs Pak : रोहित शर्मापुढे प्लेईंग 11 चा पेच, ईशान की राहुल, कुणाला मिळणार संधी?

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE: केएल राहुलला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. पण राहुलला संधी दिल्यास कुणाचा पत्ता कट होणार? हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय. 

KL Rahul and Ishan Kishan : आशिया चषकात भारतीय संघ आज पाकिस्तानसोबत दोन हात करणार आहे.  कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने कसून सराव केला आहे. केएल राहुलच्या पुनरागमनामुळे रोहित शर्मापुढे प्लेईंग 11 चा पेच उभा राहिला आहे. केएल राहुलला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. पण राहुलला संधी दिल्यास कुणाचा पत्ता कट होणार? हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय. 

दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता. पण राहुलच्या कमबॅकमुळे आता इशान किशनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. राहुलच्या अनुपस्थितीत इशान किशन याने पहिल्या दोन्ही सामन्यात विकेटकिपर फलंदाजाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तानविरोधात इशान किशन याने झुंजार 82 धावांची खेळी केली होती. आघाडीचे फलंदाज फेल गेल्यानंतर इशान किशन याने डाव सावरला होता. पण आता इशान किशनला संघात स्थान मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. 

विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुल भारताची पहिली पसंती आहे. त्यामुळे इशान किशनचा पत्ता कट होऊ शकतो. पाकिस्तानविरोधात दमदार फलंदाजी केल्यानंतरही इशान किशन याला बेंचवरच बसावे लागू शकते. 

राहुलचा नेट्समध्ये कसून सराव - 

कमबॅकनंतर केएल राहुल याने कसून सराव सुरु केला आहे. नेट्समध्ये हार्दिक पांड्यासोबत राहुलने फलंदाजीचा सराव केला. आशिया चषकात केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो.. तर हार्दिक पांड्या सहाव्या स्थानावर... राहुलने नेट्समध्ये कसून सराव केला.  विकेटकिपिंग आणि फलंदाजीचा राहुलने अभ्यास केला.

वनडेमध्ये पाकिस्तानविरोधात राहुलची कामगिरी - 

केएल राहुल याने पाकिस्तानविरोधात फक्त एक वनडे सामना खेळला आहे. 2019 च्या विश्वचषकात केएल राहुलने पाकिस्तानविरोधात एकदिवसीय सामना खेळला आहे. या सामन्यात राहुल याने 57 धावांची खेळी केली होती. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. 

केएल राहुल तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचा सदस्य -

केएल राहुल भारतासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत 47 कसोटी, 54 वनडे आणि 72 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये केएल राहुल याने 2642 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये  1986 आणि टी20 मध्ये 2265 धावा केल्या आहेत. 

पाकिस्तानविरोधात भारताची संभाव्य प्लेईंग 11 

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तानच्या प्लेईंग 11 मध्ये कोण-कोण?
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फकर झमान, एमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्कीखर अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फाहिम अशरफ, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget