IND vs PAK LIVE Score: पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द , लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चार वर्षांनतर लढत होणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 02 Sep 2023 09:52 PM
पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द

पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द

India vs Pakistan Live Updates: पावसामुळे षटके कमी करावी लागल्यास किती मिळणार टार्गेट

पावसामुळे खेळ प्रभावित झाला आहे. त्यामुळे षटके कमी होणार, आता हे जवळपास निश्चित झाले आहे. 40 षटकांचा खेळ झाल्यास पाकिस्तानला 239 धावांचे आव्हान मिळेल. 30 षटकांचा खेळ झाल्यास 203 आणि 20 षटकांचा खेळ झाल्यास 155 धावांचे आव्हान मिळेल. 

साडेदहा वाजेपर्यंत खेळ सुरुवात झाला तर पाकिस्तानला 20 षटके फलंदाजी करता येणार आहे.

साडेदहा वाजेपर्यंत खेळ सुरुवात झाला तर पाकिस्तानला 20 षटके फलंदाजी करता येणार आहे. तोपर्यंत पाऊस थांबला नाही तर सामना रद्द केला जाईल. दोन्ही संघाला 1-1 गुण दिले जातील.





सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय

सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय...  खेळाला उशीरा सुरुवात होणार

पल्लेकेले येथे पावसाला सुरुवात

पाकिस्तानची भेदक गोलंदाजी

पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताविरोधात टिच्चून गोलंदाजी केली. शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या तिकडीने भारताचा संपूर्ण संघ बाद केला. शाहिन शाह आफ्रिदी याने 4 विकेट घेतल्या. तर नसीम आणि हॅरीस रौफ यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. 

आघाडीची फळी ढेपाळली

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे रोहित शर्माचा निर्णय चुकल्याचे दिसले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. दोघेही संयमी फलंदाजी करत होते. पाचवे षटक सुरु झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शाहीन आफ्रिदी याने रोहित शर्माला त्रिफाळाचीत बाद करत भारता मोठा धक्का दिला. पहिल्या धक्क्यातून टीम इंडिया सावरणार त्याआधीच शाहीन याने दुसरा धक्का दिला. शाहीन आफ्रिदीने विराट कोहली यालाही त्रिफाळाचीत बाद करत 140 कोटी भारतीयांचा हिरमोड केला.  रोहित शर्मा याने 22 चेंडूत 11 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले. तर विराट कोहली याने एका चौकाराच्या मदतीने चार धावा केल्या. रोहित आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना शाहीन आफ्रिदी याने तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर याने डावाची सुत्रे हातात घेतली. अय्यर याने दोन खणखणीत चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. श्रेयस अय्यर आणि गिल भारताचा डाव सावरतील, असे वाटत होते. पण हॅरिस रौफ याने श्रेयस अय्यर याला फखर जमान याच्याकरवी झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. श्रेयस अय्यर याने 9 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 14 धावांचे योगदान दिले. शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. भारताने 66 धावांत चार आघाडीचे फलंदाज गमावले होते. त्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला.

बूम बूम बुमराहची दमदार फलंदाजी

सुरुवातीची फळी ढेपाळल्यानंतर इशान आणि हार्दिक यांनी डाव सावरला. पण अखेरच्या षटकात भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. मोक्याच्या क्षणी एकामागोमाग एक विकेट फेकल्या. हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी लागोपाठ विकेट फेकल्या. 204 धावा असताना इशान किशन याची विकेट पडली होती. त्यानंतर एकापाठोपाठ एक गडी तंबूत परतले. 204 वर 5 अशा सुस्थितीत असणारा भारतीय संघ 8 बाद 243 अशा दयनीय अवस्थेत पोहचला. धावसंख्या वाढवण्याच्या वेळी हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी विकेट फेकल्या. अखेरीस जसप्रीत बुमराह याने फटकेबाजी केल्यामुळे भारतीय संघ 266 धावांपर्यंत पोहचला. जसप्रीत बुमराह याने 14 चेंडूत 16 धावांची खेळी केली. 

भारताचे पाकिस्तानला 267 धावांचे आव्हान

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score: पाकिस्तानची वेगवान तिकडीसमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. भारतीय संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजीही करु शकला नाही. शहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी भारताला सर्वबाद केले. भारतीय संघाने 48.5 षटकात 266 धावांपर्यंत मजल मारली. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचलाय. इशान किशन याने 82 तर हार्दिक पांड्याने 87 धावांची खेळी केली. पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांची गरज आहे. 

इशान-हार्दिकने डाव सावरला - 

 


आघाडीचे 4 फलंदाज तंबूत परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला.  पाचव्या विकेटसाठी हार्दिक आणि इशान किशन यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली. कठीण स्थितीत या दोघांनी भारताची धावसंख्या वाढवण्याचे काम केले.  इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 141 चेंडूत 138 धावांची महत्त्वाची भागिदारी केली. इशान किशन इशान किशन आणि हार्दिक पांड्या ही जोडी धोकादायक झाली होती. पण त्याचवेळी हॅरीस रौफ याने इशान किशन याला बाद करत जोडी फोडली. इशान किशन याने 81 चेंडूत झटपट 82 धावांचे योगदान दिले. इशान किशन याने आपल्या खेळीत दोन खणखणीत षटकार आणि 9 दमदार चौकार ठोकले.  इशान किशन बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने जाडेजासोबत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पांड्या आणि जाडेजा यांच्यामध्ये 34 चेंडूत 35 धावांची भागिदारी झाली. हार्दिक पांड्याने 90 चेंडूत 87 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूरही लागोपाठ बाद झाले. रविंद्र जाडेजा 14 तर शार्दूल 3 धावांवर बाद झाले. 

भारताचा डाव संपुष्टात

266 धावसंख्येवर भारताचा डाव संपुष्टात आला... 

भारताला नववा धक्का

कुलदीप यादवच्या रुपाने भारताला नववा धक्का बसला आहे. नसीम शाह याने कुलदीपला पाठवले तंबूत

शाहीन आफ्रिदीचा भेदक मारा

शाहीन आफ्रिदीने भारताच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याने 10 षटकात 35 धावा खर्च केल्या.

भारताच्या 250 धावा

जसप्रीत बुमराहच्या फलंदाजीमुळे भारताने 250 धावसंख्या पार केली. 

ये रे माझ्या मागल्या...

भारताने लागोपाठ तीन विकेट गमावल्या.... हार्दिक पांड्या, जाडेजानंतर शार्दूलही बाद

जाडेजा तंबूत, भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली

जाडेजा तंबूत, भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली... मोक्याच्या क्षणी हार्दिकनंतर जाडेजा बाद... जाडेजाने 14 धावांची खेळी केली.

मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्या बाद

मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्या बाद झाला. भारताला सहावा धक्का बसलाय. हार्दिक पांड्याने 90 चेंडूत 87 धावांची खेळी केली.

हार्दिक पांड्याची फटकेबाजी सुरु

मैदानावर स्थिरावल्यानंतर हार्दिक पांड्या याने फटकेबाजीला सुरुवात केली आहे. हार्दिक पांड्याने हॅरिस रौफ याला चार चेंडूत तीन चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. 

भारताचा अर्धा संघ तंबूत

इशान किशन याच्या रुपाने भारताला पाचवा धक्का बसला. इशान किशन 82 धावांवर बाद झाला. इशान किशन याने 81 चेंडूत दमदार 82 धावांची खेळी केली. इशान किशन याने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी 131 धावांची भागिदारी केली.

हार्दिक पांड्याचे अर्धशतक

ईशान किशन याच्यानंतर हार्दिक पांड्या यानेही अर्धशतक ठोकले. पांड्याने 62 चेंडूचा सामना करताना अर्धशतक ठोकले. 

इशान किशनचे दमदार अर्धशतक

इशान किशन याने मोक्याच्या क्षणी अर्धशतक झळकावलेय. 54 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने किशन याने अर्धशतक ठोकले

ईशान-हार्दिकने डाव सावरला

ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरला. भारत चार बाद 132 धावा

भारतीय संघाच्या 100 धावा पूर्ण

टीम इंडियाने 19.5 षटकात 100 धावांचा पल्ला पार केला आहे. इशान किशन आणि हार्दिक पांड्या मैदानावप

भारताला चौथा धक्का, गिल बाद

शुभमन गिल याच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला आहे. गिल याने 32 चेंडूत 10 धावांवर बाद झाला. हॅरिस रौफने केले क्लिनबोल्ड

सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय आला आहे. भारताने तीन विकेटच्या मोबदल्यात 51 धावा केल्या आहेत. 

टीम इंडियाला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर 14 धावांवर बाद

पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफ याने टीम इंडियाला तिसरा धक्का दिला आहे.  श्रेयस अय्यर याला 14 धावांवर झेलबाद केले आहे... भारत तीन बाद 48 धावा 

श्रेयस अय्यर-गिल यांच्यावर मदार

विराट कोहली आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आता सर्व मदार श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यावर आहे. 

भारताला मोठा धक्का

भारताला मोठा धक्का बसलाय.. विराट कोहली स्वस्तात बाद झालाय.... भारत दोन बाद 27 धावा

भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित माघारी परतला

शाहिन आफ्रिदीने भारताला पहिला धक्का दिला.. कर्णधार रोहित शर्मा बाद झाला आहे.  

IND vs PAK LIVE Score: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा खोडा, खेळपट्टीवर कव्हर्स

IND vs PAK LIVE Score: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा खोडा, खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. भारताचे फलंदाज आणि पाकिस्तानचे खेळाडू पेव्हेलिअनमध्ये परतले आहेत. 





4 षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय

4 षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय... रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. 

रोहित-गिलची सावध सुरुवात

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सावध सुरुवात केली आहे. 3.1 षटकानंतर भारताने बिनबाद 14 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 11 धावांवर खेळत आहे. 

पल्लेकेले येथे पावसाची विश्रांती

पल्लेकेले येथे पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. 

रोहित शर्मा-शुभमन गिल मैदानात

रोहित शर्मा-शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी गोलंदाजीची धुरा सांभाळत आहे. 

भारताची प्लेईंग 11 - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

पाकिस्तानची प्लेईंग 11

इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी 

भारताची प्रथम फलंदाजी

भारताचा कर्णधार रोहित शर्माने हायहोल्टेज सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह याचे टीम इंडियात कमबॅक झालेय. तर दुसरीकडे पाकिस्तानने नेपाळविरोधातील विजयी संघ मैदानात उतरवला आहे.  नाणेफेकीनंतर बोलताना बाबर आझम याने प्रथम फलंदाजी करायची होती, असे सांगितले. रोहित शर्माने मोक्याच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. आता सामना कोणत जिंकणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


मोहम्मद शामी याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालेले नाही. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या जोडीला शार्दूल ठाकूर याला स्थान दिलेय. मध्यक्रममध्ये श्रेयस अय्यर याचे कमबॅक झालेय. 

भारताने नाणेफेक जिंकली

हायव्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा आणि बाबार आझम नाणेफेकीला मैदानात उतरतील.





भारत आणि पाकिस्तानचे संघ मैदानात

भारत आणि पाकिस्तानचे संघ सरावासाठी मैदानात आले आहेत. दोन्ही संघामध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. पावसामुळे सामना रद्द न झाल्यास रंगतदार लढाई पाहायला मिळेल. 

पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय ? 

मुसळधार पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तान संघाला प्रत्येकी एक एक गुण दिले जातील. अशा स्थितीमध्ये पाकिस्तानचा संघ सुपर ४ साठी पात्र होईल.  दुसरीकडे भारताला साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकावाच लागणार आहे. आशिया चषकातील भार

IND vs PAK Live Update: सरावासाठी भारतीय खेळाडू मैदानात

टीम इंडिायचे शिलेदार खेळपट्टीसाठी मैदानात उतरले आहेत. खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. रिमझिम पाऊस सुरु आहे.  

पावसामुळे व्यत्यय आल्यास काय ?






पावसाची शक्यता - 

कँडीमध्ये शनिवारी पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ५१ टक्के पावसाची शक्यता आहे. तर दुपारी ७० टक्के पाऊस कोसळू शकतो. संध्याकाळी पावसाचा अंदाज नाही. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे


 

पावसाचे संकट, पल्लेकेलेच्या खेळपट्टीवर कव्हर्स

IND vs PAK Weather Update : भारत आणि पाकिस्तान हायहोल्टेज सामन्यावर पावसाचे संकट ओढावले आहे. दुपारपासून कँडीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पल्लेकेले स्टेडिअमवर पावसाने लंपडाव सुरु केला आहे. पावसामुळे पल्लेकेले स्टेडिअमच्या खेळपट्टीला कव्हर्सने झाकण्यात आले आहे. दुपारी दीड वाजल्यापासून पल्लेकले येथे जोरदार पाऊस सुरु झाला आहे. खेळपट्टी खराब होऊ नये म्हणून मैदानाच्या स्टाफने कव्हर्स मैदानावर टाकले आहेत. सकाळपासून पल्लेकेले येथे रिमझिम पाऊस सुरु होता. पण एक वाजल्यापासून पावसाने जोर धरला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामन्यात पावसाने खोडा घातल्यास अनेक क्रीडा प्रेमींची निराशा होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चार वर्षांनंतर एकदिवसीय सामना होत आहे. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11 

ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

हेड टू हेट स्थिती काय ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हायहोल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत 132 एकदिवसीय  सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 55 सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत.

पाकिस्तानची प्लेईंग 11

इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी 

हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?

आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती. आणि 2 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.

पार्श्वभूमी

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीला आता आवघे काही तास शिल्लक आहेत.  2019 नंतर भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय सामना खेळत आहेत. या हायहोल्टेज सामन्याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  शनिवारी दुपारी या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी पिच रिपोर्ट, प्लेईंग 11 अन् इतर बाबी जाणून घेऊयात..


हेड टू हेट स्थिती काय ?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हायहोल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत 132 एकदिवसीय  सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 55 सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत.


हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?


आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती. आणि 2 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.


कुठे होणार सामना, कशी आहे खेळपट्टी ? -  


बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ज्या मैदानावर सामना झाला तिथेच भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. कँडी येथील पल्लेकेले स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत करते... मधल्या षटकात चेंडू स्विंगही होतो... त्यावेळी फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लो स्कोअरिंग होऊ शकतो. 


पावसाची शक्यता - 


कँडीमध्ये शनिवारी पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ५१ टक्के पावसाची शक्यता आहे. तर दुपारी ७० टक्के पाऊस कोसळू शकतो. संध्याकाळी पावसाचा अंदाज नाही. पावसामुळे सामन्यत व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे.


कुणाचे पारडे जड - 


भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटले की चाहत्याच्या नजरा सामन्याकडेच असतात. एक काळ असा होता की, भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी असा सामना असायचा... पण आता पाकिस्तानच्या तोडीस तोड भारताची गोलंदाजी आहे आणि भारताच्या फलंदाजीला आव्हान देणारी पाकिस्तानची फलंदाजी आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल.  जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज पाकिस्तानच्या गोलंदाजापेक्षा कमी नाहीत. पाकिस्तानची फलंदाजीही दमदार आहे.  बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा आणि इमाम उल हक शानदार फॉर्मात आहेत. इफ्तिखारही रंगात आहे. शनिवारी रोमांचक सामना होईल. दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत.  


पाकिस्तानची प्लेईंग 11


इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी 


भारताची संभाव्य प्लेईंग 11 


ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.


हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?


आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती. आणि 2 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?


भारतात कधी पाहता येणार IND vs PAK हायव्होलटेज सामना?
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. 


लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.


आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.


राखीव खेळाडू : संजू सॅमसन


आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ 
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.