![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs NZ WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड, धोनीलाही टाकलं मागे
IND vs NZ WTC Final : सध्या इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड असा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. याच अंतिम सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat kohali) नं अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
![IND vs NZ WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड, धोनीलाही टाकलं मागे IND vs NZ WTC Final virat kohli become first indian player play 61 test matches as captain breaks ms dhonis record IND vs NZ WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड, धोनीलाही टाकलं मागे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/16/ee3cdfb4e60c03918b36167a2019de9d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs NZ WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमधील साउथॅम्प्टनमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. विराट कोहली टीम इंडियाच्या कसोटी सामन्यांत सर्वाधित सामन्यांत कर्णधार म्हणून नेतृत्त्व करणारा खेळाडू बनला आहे. यामध्ये विराटनं टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाही मागे टाकलं आहे. विराट कोहली एकामागोमाग एक रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे.
कर्णधार म्हणून खळतोय 61वा कसोटी सामना
विराट कोहली भारताच्या वतीनं कर्णधार म्हणून 61वा कसोटी सामना खेळत आहे. हा एक अनोखा रेकॉर्ड आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने 60 कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून टीम इंडियाचं नेतृत्त्व केलं होतं. तसेच विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने अनेक ऐतिहासिक विजय आपल्या नावे केले आहेत.
आतापर्यंत किती कसोटी सामने जिंकले?
विराट कोहलीने कर्णधार म्हणून आतापर्यंत 61 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 36 सामन्यांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे. तर 14 सामन्यांत पराभव झाला आहे. एवढंच नाहीतर त्यापैकी 10 सामने ड्रॉ झाले आहेत. ही आकडेवारी पाहता, विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं विजयी वाटचाल कायम ठेवली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
घरच्या मातीत बहुतेक मालिका जिंकल्याचा विक्रम
विराट कोहलीच्या नावे घरगुती मैदानावर सर्वाधिक 10 कसोटी सामने जिंकल्याचा रेकॉर्डही नोंदवण्यात आला आहे. हा रेकॉर्ड विराट कोलही व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या नावेही आहे. कोहलीचं नाव आतापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये घेतलं जातं. अशातच विराट आपल्या नावे रेकॉर्ड्सचा डोंगर रचत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यात दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळं खेळ वेळेआधीच थांबवला
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना काल (शनिवारी) सुरु झाला आहे. शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्याने भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील सामन्याला आजपासून सुरुवात झाली. न्यूझीलँडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित आणि शुभमन गिलनं चांगली सुरुवात करुन दिली. मात्र काल पावसामुळं दिवस वाया गेल्यानंतर आजही अंधूक प्रकाशामुळे खेळात व्यत्यय आला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स गमावत 146 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे अर्धशतकी भागीदारी रचत मैदानात आहेत.
रोहित आणि शुभमन गिलकडून आश्वासक सुरुवात
भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची आश्वासक सुरुवात केली. 61 धावांवर रोहित 34 धावांवर बाद झाला. काईल जेमीसनने रोहितला बाद केले. रोहित बाद झाल्यानंतर लगेच नील वॅग्नरने शुभमनला बाद केले. शुभमनने 28 धावा केल्या. यानंतर चेतेश्वर पुजारा 8 धावांवर बाद झाला. पुजारानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेसह विराटने भारताला शतकी पल्ला गाठून दिला. तिसऱ्या सत्रानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला. मात्र 46 व्या षटकात अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. विराट कोहली 44 तर अजिंक्य 29 धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)