एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IND vs NZ 2nd ODI: पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी, दुसऱ्या सामन्यात बदल होणार?

IND vs NZ 2nd ODI: पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

IND vs NZ 2nd ODI: पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेईंग11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यजमान न्यूझीडंलने पहिल्या सामन्यात भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 306 धावांचा डोंगर उभा केला होता. न्यूझीलंडने हे आवाहान सात गडी राखून 48 व्या षटकात पूर्ण केले होतं. श्रेयस अय्यर (80), कर्णधार शिखर धवन (72) आणि शुभमन गिल (50) यांनी अर्धशतकी खेळी केली होती. तर न्यूझीलंडकडून टॉम लेथम यानं शतकी खेळी केली होती. तर केन विल्यमसन यानं निर्णायाक अर्धशतकी खेळी केली होती. 

पहिल्या सामन्यात कमकुवत गोलंदाजी 
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमकुवत गोलंदाजी केली होती. 307 धावांचा बचाव भारतीय गोलंदाजांना करता आला नाही. विल्यमसन आणि लेथम यांनी सहज या धावांचा पाठलाग केला होता. अर्शदीपने 8 षटकात 68, चहलने 10 षटकात 67, उमरान मलिकने 10 षटकात 66 तर शार्दुल ठाकूरने 9 षटकात 63 धावा दिल्या होत्या. वॉशिंगट सुंदर याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखता आल्या नव्हत्या. वॉशिंगटन सुंदरने दहा षटकात 42 धावा खर्च केल्या होत्या. उमरान मलिकला दोन विकेट तर शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली होती. 

दुसऱ्या सामन्यात बदल होणार?
पहिल्या सामन्यात गोलंदाजी निष्प्रभ झाली होती. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. शिखर धवन दुसऱ्या सामन्यात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला स्थान देऊ शकतो. कुलदीप आणि चाहल ही जोडी मैदानात दिसू शकते. त्याशिवाय शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चाहरला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात येऊ शकते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान रविवारी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

सिडॉन पार्कवर भारताची खराब कामगिरी-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये हॅमिल्टनच्या सिडॉन पार्कवर सामना होणार आहे. या मैदानावर भारतीय संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाला आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. भारताने या मैदानावर न्यूझीलंडविरोधात सात सामने खेळले आहेत, यापैकी सहा सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. 

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Will Become Maharashtra New CM : ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारTop 80 At 8AM 29 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या  Maharashtra PoliticsABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9AM 29 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Maharashtra New CM : दिल्लीत ठरलं!भाजपचाच मुख्यमंत्री; लवकरच औपरचारिक घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Embed widget