Ind vs Nz 3rd Test : मुंबई कसोटीत जडेजा-अश्विनची जादू! दुसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडचे 9 फलंदाज तंबुत! टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतासाठी कभी खुशी कभी गम असा राहिला.
India vs New Zealand 3rd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतासाठी कभी खुशी कभी गम असा राहिला. शुभमन गिल आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात संघाची धावसंख्या 263 धावांपर्यंत नेली. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 171 धावा करत 143 धावांची आघाडी घेतली आहे. या काळात त्याने 9 विकेट गमावल्या आहेत. म्हणजेच टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर आहे.
दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडून एजाज पटेल नाबाद आहेत. टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र बाद झाले, त्यानंतर इतर फलंदाजही काही विशेष करू शकले नाहीत. न्यूझीलंडकडून विल यंगने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 51 धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून रवींद्र जडेजा हा भारतासाठी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. रवींद्र जडेजाने 4 विकेट घेतल्या. याशिवाय रवी अश्विनने 3 फलंदाजांना आपले आऊट केले. आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदरने 1-1 विकेट घेतली आहे. आज दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे 15 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.
Stumps on Day 2 in Mumbai!
— BCCI (@BCCI) November 2, 2024
A fine bowling display from #TeamIndia as New Zealand reach 171/9 in the 2nd innings.
See you tomorrow for Day 3 action 👋
Scorecard - https://t.co/KNIvTEy04z#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zJcPNgGWuJ
याआधी भारताने दुसऱ्या दिवसाच्या 4 बाद 84 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी 96 धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. त्यामुळे भारतीय संघ 263 धावांवर बाद झाला.
ऋषभ पंत 59 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तर शुभमन गिलने 146 चेंडूत 90 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला. सर्फराज खान एकही धाव न काढता आऊट झाला. रवींद्र जडेजाने 14 धावा केल्या. तर रवी अश्विनने 6 धावांचे योगदान दिले. आकाशदीप शून्यावर बाद झाला. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. न्यूझीलंडसाठी एजाज पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एजाज पटेलने 5 फलंदाजांना बाद केले. याशिवाय मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधीने प्रत्येकी 1 बळी घेतला.
हे ही वाचा -