IND vs NZ 2nd test Kane Williamson : पुणे कसोटीआधी संघाला मोठा धक्का! माजी कर्णधार दुसऱ्या कसोटीतून बाहेर
Kane Williamson IND vs NZ 2nd test News : भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
![IND vs NZ 2nd test Kane Williamson : पुणे कसोटीआधी संघाला मोठा धक्का! माजी कर्णधार दुसऱ्या कसोटीतून बाहेर IND vs NZ 2nd test Kane Williamson to miss second Test against India in Pune Cricket News Marathi IND vs NZ 2nd test Kane Williamson : पुणे कसोटीआधी संघाला मोठा धक्का! माजी कर्णधार दुसऱ्या कसोटीतून बाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/22/6b7ecb6bd96da05f99548cb926eb23e717295744700931091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs New Zealand 2nd test Kane Williamson : भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकल्यानंतर भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला होता. पण आता पहिल्या सामन्यातील पराभव त्याच्यासाठी नक्कीच डोळे उघडणारा असेल. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघाचे महान फलंदाज गडगडले आणि संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर गारद झाला. याच कारणामुळे टीम इंडियाने 36 वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना गमावला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता उभय संघांमधील दुसरा सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्याच्या मैदानावर होणार आहे. मात्र या कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला असून या सामन्यात त्यांचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन खेळणार नाही.
श्रीलंका दौऱ्यात केन विल्यमसनला कंबरेच्या समस्येचा सामना करावा लागला होता, ज्यातून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. दुखापतीमुळे तो श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. भारताविरुद्ध या दुखापतीमुळे तो पहिल्या कसोटीतही खेळू शकला नाही. दुसऱ्या कसोटीत विल्यमसनची अनुपस्थिती त्याच्यासाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही, कारण तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याने संघाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. त्याने न्यूझीलंडसाठी 102 कसोटी सामन्यांमध्ये 8881 धावा केल्या आहेत ज्यात 32 शतकांचा समावेश आहे.
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, केन विल्यमसनवर लक्ष ठेवून आहे. तो योग्य दिशेने आहे, परंतु तो अद्याप 100% तंदुरुस्त झाला नाही. येत्या काही दिवसांत आणखी सुधारणा होण्याची आशा असून तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल. आम्ही त्यांना स्वतःला तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देऊ.
न्यूझीलंडने भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकून इतिहास रचला होता. त्यानंतर किवी संघाने 1988 पासून भारतीय भूमीवर कसोटी सामना जिंकला आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत भारतीय भूमीवर एकूण 37 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ 3 कसोटी सामने जिंकले असून 17 कसोटी सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हे ही वाचा -
Ind vs Aus: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, इशान किशनचं कमबॅक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)