IND Vs ENG : ऋषभ पंत कोरोनामुक्त; लवकरच टीमसोबत प्रॅक्टिस करताना दिसणार
IND Vs ENG : ऋषभ पंत कोरोनामुक्त झाला असून लवकरच टीम इंडियासोबत प्रॅक्टिस करताना दिसणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या वतीनं देण्यात आली आहे.
IND Vs ENG : इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियासाठी आनंदाची बातमी. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेला ऋषभ पंत कोरोनामुक्त झाला आहे. एवढंच नाहीतर ऋषभ पंतने आयसोलेशनचा अवधी पूर्ण केला आहे. तसेच डरहममध्ये भारतीय संघासोबत लवकरच सराव करताना दिसून येणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं यासंदर्भात माहिती दिली आहे.
बीसीसीआयनं ऋषभ पंत कोरोनामुक्त झाल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. बीसीसीआयनं ट्वीट करत म्हटलं आहे की, "हॅलो पंत, तुला पुन्हा संघासोबत पाहून आनंद झाला."
बीसीसीआयनं 15 जुलै रोजी पंत आणि सहाय्यक प्रशिक्षक दयानंद गरानी या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची घोषणा केली होती. बीसीसीआयनं सांगितलं होतं की, ऋषभ पंतला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. तोपर्यंत ऋषभ पंतनं आपल्या आयसोलेशनचे 8 दिवस पूर्ण केले होते. दरम्यान, ऋषभ पंत आणि सहाय्यक प्रशिक्षक दयानंद गरानी या दोघांच्याही संपर्कात आलेल्या खेळाडूंनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं.
असं पहिल्यांदाच होतंय! टीम इंडिया एक सोबत खेळतेय दोन मालिका
भारतीय क्रिकेट इतिहासात असं पहिल्यांदाच होत आहे की टीम इंडिया एक सोबत दोन सीरिज खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे याच काळात शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाचा दुसरा चमू श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स हरल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाचं लक्ष आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर आहे तर दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासात असं पहिल्यांदाच झालं आहे की टीम इंडिया एक सोबत दोन सीरिज खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम या दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर दुसरीकडे याच काळात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. यामुळंच श्रीलंका दौऱ्यात त्याच खेळाडूंना जागा मिळाली आहे जे भारतीय कसोटी संघात सहभागी नाहीत. इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर पाचवी कसोटी 10 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.