नवी दिल्ली: 'एशियाई क्रिकेट काऊंसिल (Asian Cricket Council)मध्ये आता भारताचा दबदबा असणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांची नियुक्ती एशियाई क्रिकेट काऊंसिलचे नवे अध्यक्ष म्हणून झाली आहे. आता ते नजमुल हसन यांची जागा घेतील. जय शाह शनिवारी एकमताने एशियाई क्रिकेट काऊंसिल (एसीसी)च्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. वर्तमान अध्यक्ष बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी)चे प्रमुख नजमुल हसन पापोन यांची जागा आता ते घेणार आहेत.
बीसीसीआय कोषाध्यक्ष अरूण सिंह धूमल यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. धूमल ने यांनी म्हटलं आहे की, 'एशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल जय शाह यांचं अभिनंदन. मला खात्री आहे की, एसीसी आपल्या नेतृत्वात नव्या उंचीवर जाईल. ज्याचा फायदा आशियातील सर्व खेळाडूंना लाभ होईल. त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा, असं धूमल यांनी म्हटलं आहे.
एसीसीकडे एशिया कप टूर्नामेंटच्या आयोजनाची जबाबदारी असते. कोरोना महामारीमुळं 2020 सालात होणारी एशिया कप स्पर्धा जूनपर्यंत स्थगित केलं आहे. पाकिस्तानामध्ये ही स्पर्धा होणार होती मात्र आता या स्पर्धेचं आयोजन श्रीलंका किंवा बांग्लादेशमध्ये होऊ शकतं.