IND vs ENG: अहमदाबादच्या मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडकडून कधीही हारलेला नाही. दरम्यान, यजमान इंग्लंडविरुद्ध या ठिकाणी आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. भारताने एक सामना जिंकला असून दुसरा बरोबरीत सुटला. नव्याने बांधलेल्या या स्टेडियममध्ये भारताला इंग्लंडविरुद्ध आगामी चार सामन्यांच्या मालिकेतील तिसर्‍या आणि चौथ्या कसोटी सामन्यांचे आयोजन करावे लागेल. तिसरा सामना दिवस रात्र असा असेल. हा सामना 24 फेब्रुवारीला सुरू होईल तर चौथा सामना 4 मार्चपासून सुरू होईल.


2012 मध्ये दोन्ही संघांमध्या अखेरचा सामना अ‍ॅलिस्टर कुकच्या नेतृत्वात इंग्लंडने खेळला होता. या भारताने संघाने हा सामना नऊ विकेट्सने जिंकला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना चेतेश्वर पुजाराने नाबाद २०6 धावांची खेळी केली होती आणि वीरेंद्र सेहवागने 117 धावांची शानदार खेळी करत 521/8 विकेट्स वर घोषित केले होते.


प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ 191 धावांवर आऊट झाला. डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने पाच विकेट घेण्याचा विक्रम केला तर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने तीन गडी बाद केले. यानंतर इंग्लंडकडून दुसर्‍या डावात कर्णधार कूकने 199 धावा केल्या तर यष्टीरक्षक मॅट प्रायरने 91 धावा फटकावल्या. इंग्लंडचा संघ 406 धावापर्यंतचं मजल मारु शकला, ओझाने पुन्हा चार विकेट घेतल्या तर उमेशने तीन गडी बाद केले.


सेहवागची विकेट गमावताना भारताने 77 धावांचे लक्ष्य सहज गाठले. पुजारा आणि विराट कोहली अनुक्रमे 41 आणि 14 धावा करत नाबाद राहिले. एकूणच, अहमदाबादमध्ये भारताने आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले आहेत. यात चार सामने जिंकले आहेत तर दोन सामने गमावले आहेत आणि सहा सामने जिंकले आहेत. 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताने दोन सामने गमावले आहेत.


1982 मध्ये बांधलेले अहमदाबादचे सरदार पटेल स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, ज्याची क्षमता एक लाख 10 हजार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आगामी मालिकेची पहिली कसोटी 5 फेब्रुवारीपासून तर दुसरा सामना 13 फेब्रुवारीपासून होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हे दोन्ही सामने खेळले जातील.