एक्स्प्लोर

IND vs ENG 1st Test: 36 वर्षांनी चेन्नईत इंग्लंडकडून टीम इंडिया पराभूत

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे.

IND vs ENG 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव झाला आहे, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  या पराभवाबरोबर टीम इंडियाला चिन्नास्वामी स्टेडियमवर गेल्या 22 वर्षांत प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे.

टीम इंडियाने पहिला कसोटी सामना 227 धावांनी गमावला. 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा संपूर्ण संघ 192 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने टीम इंडियाकडून सर्वाधिक 72 धावा केल्या. शुभमन गिल 50 धावा केल्या. इंग्लंडकडून जॅक लीचने 4, जेम्स अँडरसनने 3, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि डॉम बाईसने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जो रूटच्या 218 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 337 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून डॉम बाईस चार विकेट्स घेतल्या. दुसर्‍या डावात इंग्लंडचा डाव 178 धावांवर आटोपला. पहिल्या डावात इंग्लंडला 241 धावांची आघाडी होती. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे मोठे आव्हान मिळाले. शेवटच्या दिवशी टी ब्रेक होण्यापूर्वी टीम इंडियाचा संघ 192 धावांवर बाद झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे.

INDvsENG 1st Test : अश्विनची ऐतिहासिक कामगिरी; 'हा' विक्रम करणारा 100 वर्षातील एकमेव फिरकीपटू

36 वर्षांनंतर चेन्नईत टीम इंडियाचा इंग्लंडकडून पराभव

यापूर्वी इंग्लंडने 1985 मध्ये चेन्नईच्या मैदानावर टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर चेपॉकमध्ये दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामने खेळले गेले, पण प्रत्येक वेळी सामना टीम इंडियाने जिंकला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात 2016 मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटचा सामना झाला होता. तो सामनाही टीम इंडियाने एक डाव आणि 75 धावांनी जिंकला होता.

22 वर्षांनी चेन्नईत टीम इंडियाचा पराभव

गेल्या 22 वर्षात चेन्नईत टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. याआधी एमए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडियाला 1999 मध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर या मैदानावर टीम इंडियाने एकही कसोटी सामना गमावला नव्हता. पण इंग्लंडने सर्व समीकरणे बदलली आणि मोठा विजय मिळवला. टीम इंडियाच्या फिरकीपटूंना उपयुक्त अशा खेळपट्टीवर टीम इंडियाचा पराभव करणे हे इंग्लंडचं मोठं यश आहे.

Uttarakhand Glacier Collapse: उत्तराखंडमधील आपत्तीमुळे ऋषभ पंत दु:खी; मदतीसाठी पुढे सरसावला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget