एक्स्प्लोर

Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला

Sanju Samson : टीम इंडियाचे माजी सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी संजू सॅमसनला पुन्हा संधी द्यायची असेल तर टॉप ऑर्डरमध्ये द्यावी, असं म्हटलं आहे. 

नवी दिल्ली : भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीममध्ये मोठे फेरबदल केले.2028 च्या टी 20  वर्ल्ड कपच्या तयारीसाठी संघ बांधणी म्हणून सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन वगळण्यात आलं, त्याला संघात देखील स्थान देण्यात आलं नाही. टीम इंडियात मोठे बदल करत श्रेयस अय्यरला कर्णधार करण्यात आलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतानं आयर्लंड विरोधातील दोन टी 20 सामन्यांची मालिका गमावली. यानंतर इंग्लंड विरोधातील पहिल्या तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आलेला नाही. पहिला सामना पावसामुळं रद्द झाला असला तरी दुसरा आणि तिसरा टी 20 सामना टीम इंडियाला गमवावा लागला. दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासमोर प्रेक्षकांनी संजू सॅमसनला पुन्हा संधी द्या अशी घोषणाबाजी केली. भारताचे माजी सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी संजू सॅमसनच्या टीम इंडियामधील स्थानासंदर्भात भाष्य केलं आहे. टीम मॅनेजमेंटनं संजू सॅमसनला संधी द्यायची असेल तर टॉप ऑर्डरमध्ये द्यावी, असं म्हटलं आहे. 

अभिषेक नायर संजू सॅमसन बाबत काय म्हणाले? 

अभिषेक नायर म्हणाले की संजू सॅमसनला संघात परत आणताना असल्यास टीम कॉम्बिनेशन बिघडवू नये. संजू सॅमसनला जर टॉप-3 मध्ये स्थान मिळणार असेल तर त्याला पुन्हा संधी द्यावी. मधल्या फळीत त्याला संधी दिल्यास चांगले रिझल्ट मिळणार नाहीत, असंही नायर यांनी म्हटलं. 

अभिषेक नायर म्हणाले की जर तुम्हाला संजू सॅमसनला परत संघात आणायचं असेल तर अशा ठिकाणी फलंदाजीसाठी संधी दिली पाहिजे, जिथं तो यशस्वी होऊ शकेल. संजू सॅमसनला 4,5,6 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणं ही चांगली संकल्पना नाही. संजूनं त्या क्रमांकावर अधिक काळ फलंदाजी केलेली नाही. तिथं तो यशस्वी देखील झालेला नाही, असं अभिषेक नायर म्हणाले. 

संजू सॅमसन जेव्हा सलामीला फलंदाजी करतो किंवा टॉप -3 मध्ये फलंदाजी करतो तेव्हा चांगली कामगिरी करतो. तुम्ही जर त्याला त्या स्थानी संधी देत नसाल तर  संजू सॅमसनला तुम्ही न खेळवणं चांगलं ठरेल. भारताचा सध्याचा फलंदाजी क्रम आहे तोच कायम ठेवणं योग्य ठरेल.

टीम इंडियानं यावर गांभीर्यानं विचार करावा, गौतम गंभीर बरोबर म्हणाला की भारतानं 190 धावा केल्या. मात्र, धावांचा पाठलाग करताना टीमला संघर्ष करावा लागत आहे. खेळाडूंनी परिस्थिती समजून घेतली नाही त्यामुळं ते योग्य गती पकडू शकले नाहीत. संघात बदल करायचा आहे म्हणून बदल करत असाल आणि संजू सॅमसनला संघात संधी देणार असाल तर जिथं तो यशस्वी होईल तिथं त्याला फलंदाजीला संधी द्यावी, असं अभिषेक नायर म्हणाले.

अभिषेक नायर म्हणाले की उपकप्तान तिलक वर्मा खराब फॉर्मचा सामना करतोय. त्यानं एकदा 45 बॉलमध्ये 56 धावा केल्या आहेत. यानंतर एकाही डावात तो 20 पेक्षा अधिक धावा करु शकला नाही. तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये तिलक वर्मा 11 बॉलमध्ये 3 धावा करुन बाद झाला.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget